Dasara: टाळ्या, शिट्ट्या आणि डान्स; नानीच्या 'दसरा' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Nani Dasara: सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना (South Movies) प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अॅक्शन सिन्स, डायलॉग्स आणि गाणी या सर्व गोष्टींमुळे साऊथ चित्रपट हिट ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच दसरा चित्रपटाच्या थिएटरमधील शोदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक हे दसरा चित्रपट बघताना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवाताना दिसत आहेत.
इंस्टेंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दसरा हा चित्रपट बघताना प्रेक्षक थिएटरमध्ये डान्स करतात, असं दिसत आहे. तसेच प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजताना देखील दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
दसरा चित्रपटानं केली कोट्यवधींची कमाई
एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाची निर्मिती 65 कोटींमध्ये करण्यात आली आहे. तर या चित्रपटाचे डिजिटल आणि थिएटर राइट्स 29 कोटी आणि 48 कोटीमध्ये विकले गेले आहेत. त्यामुळे आता रिलीज आधीच या चित्रपटाला 12 कोटींचा नफा झाला. ओपनिंग डेला या चित्रपटानं 23 कोटींची कमाई केली.
या कलाकारांनी साकारली प्रमुख भूमिका
श्रीकांत ओडेला यांनी दसरा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात नानीसोबतच साई कुमार, समथिरकानी, दीक्षित शेट्टी, संतोष नारायणन आणि जरीना वहाब या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
तेलूगू, तमिल, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये दसरा हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता हा चित्रपट ब्लोकबस्टर ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच नानीच्या चाहत्यांना मिळेल.
दसरा या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) देखील इम्प्रेस झाले होते. एस. एस. राजामौली यांनी ट्वीट शेअर करुन 'दसरा' चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केलं होतं.
महत्वाच्या इतर बातम्या: