एक्स्प्लोर

Nana Patekar : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं; म्हणाले, "भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा"

Nana Patekar Post : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी सुधीर मुनगंटीवारांना डिवचलं आहे.

Nana Patekar On Sudhir Mungantiwar Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : महान योद्धे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची लंडनमध्ये असणारी वाघनखे (Wagh Nakh) लवकरच भारतात आणण्यात येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) स्वत: वाघनखे आणायला लंडनला जाणार आहेत. दरम्यान अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एक पोस्ट शेअर करत मुनगंटीवारांना डिवलचं आहे.

नाना पाटेकरांची पोस्ट काय? (Nana Patekar Post)

शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवारांना डिवलचं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत..त्याबद्दल अभिनंदन...जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा". नानांच्या या पोस्टवर कोथळा काढलाय पण तुम्हाला डोळ्यावरील पट्टीमुळे दिसत नाही, भ्रष्टाचाराचा कोथळा काढायचा म्हणजे स्वत:च्या सरकारवर वार केल्यासारखं होईल, महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढणार नाहीत, उलट विरोधी व सत्ताधारी हे दोघेही भ्रष्टाचाराचा विरोध करतील आणि त्याचाच आर्थिक कोथळा काढतील, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Nana Patekar (@iamnanapatekar)

नेमकं प्रकरण काय? 

अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा बाहेर काढणारी शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार असल्याचं ते म्हणाले. 

अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधील विक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात (London Victoria And Albert Museum) ठेवण्यात आली आहेत. पण आता डिसेंबरपर्यंत ही वाघनखे महाराष्ट्रात आणखी जाणार आहेत. शिवरायांनी ज्या दिवशी अफजलखानाचा वध केला त्यादिवशीच ही वाघनखे महाराष्ट्रात आणली जातील असे म्हटले जात आहे. शिवरायांची ही वाघनखे अनमोल ठेवा असून ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya) ठेवण्यात येणार आहेत. 

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांची वाघनखं यावर्षीच मायभूमीत परतणार, सुधीर मुनगंटीवार महिनाअखेरीस लंडनला जाणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget