एक्स्प्लोर

Nana Patekar : 'त्या' सीनच्या वेळी अभिनेत्याची पँट खरंच ओली झाली... नाना पाटेकरांनी सांगितला तो किस्सा

Nana Patekar latest News : नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'प्रहार' चित्रपट आजही लोकप्रिय आहे. आपल्या दिग्दर्शनातील पदार्पणाच्या चित्रपटाच्या वेळी घडलेला एक किस्सा नाना पाटेकरांनी सांगितला.

Nana Patekar :  आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी सिनेसृष्टीत छाप सोडली आहे. नाना पाटेकर यांची भूमिका असलेल्या चित्रपटांचे आजही कौतुक सुरू असते. नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'प्रहार' (Prahaar) चित्रपट आजही लोकप्रिय आहे. आपल्या दिग्दर्शनातील पदार्पणाच्या चित्रपटाच्या वेळी घडलेला एक किस्सा नाना पाटेकरांनी सांगितला. 

नाना पाटेकर यांनी 'प्रहार' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. 'द लल्लनटॉप' या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी विविध प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली. 'प्रहार'या आपल्या पहिल्या दिग्दर्शनातील चित्रपटाबाबत बोलताना नानांनी सांगितले की, 'परिंदा'नंतर 'प्रहार'ची जुळवाजुळव सुरू केली. मलाही आर्मीत जायचे होते, या चित्रपटाच्या निमित्ताने मी ती इच्छाही पूर्ण केली. या चित्रपटात सई परांजपे यांचा मुलगा गौतम जोगळेकर हा सिनेमाटोग्राफर देबू देवधर यांचा अस्टिस्टंट होता. त्याला मी या भूमिकेसाठी निवडले. त्यावेळी देबूने म्हटले की ह्याला व्यवस्थित बोलता येत नाही. पण, मी त्याला सांगितले की मला असाच अभिनेता हवाय.

प्रहार हा अधिक ऑथोंटिक चित्रपट झाला होता. त्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये असलेले सुनिल देशपांडे यांनी मदत केली होती. त्याशिवाय, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह हे त्यावेळी कमांडो विंगमध्ये होते. त्यांनीदेखील सहकार्य केले. 

त्या अभिनेत्याची हालत गंभीर...

प्रहार चित्रपटात असलेल्या प्रशिक्षणाच्या दरम्यानच्या शूटिंगचा किस्सा नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितला. आपल्याला पाय ठेवण्यासाठी दोन इंचाची जागेची गरज असते. त्या प्लॅटफॉर्मवर साधारणपणे चार इंचाची जागा होती. त्या सीनमध्ये खाली पाहिले की भीती वाटायची. पण फक्त पायाकडे लक्ष दिल्यास चालता येत असे, असेही नाना पाटेकरांनी म्हटले. त्या आर्मी ट्रे्निंगच्या शूटच्या वेळी  60 फूट उंचीवरून चालायचे होते. त्यावेळी शिव सुब्रम्हण्यम या कलाकाराला उंचीची भीती वाटत होती. त्यात त्याने खाली पाहिल्याने आणखीच घाबरला. त्यावेळी भीतीने या कलाकाराने भीतीने पँट ओली केली आणि रडू लागला होता, असे नाना पाटेकर यांनी सांगितले. 

या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त काम केले. त्यांच्या कामामुळे आणि देबू देवधर यांच्या सिनेमॅटोग्राफीमुळे चांगला परिणाम साधला गेला असल्याचेही नाना पाटेकर यांनी सांगितले. 'प्रहार' नंतर मात्र आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी चित्रपटात काम करू लागलो असल्याचे नाना पाटेकरांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!India Won T20 World Cup : एका कॅचने फिरवली मॅच..17 वर्षांनी भारत विश्वविजेता! ABP MajhaIndia Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
Embed widget