(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nachiket Barve On National Award : राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही शाबासकी : नचिकेत बर्वे
National Film Awards 2022 : 'तान्हाजी' सिनेमा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा ठरला आहे.
Nachiket Barve On National Award : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards 2022) घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'तान्हाजी' (Tanhaji) या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार, अजयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर मराळमोळ्या नचिकेत बर्वेला (Nachiket Barve) वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नचिकेत म्हणाला,"राष्ट्रीय पुरस्कार मला जाहीर होणं हे खूप आनंददायी आहे. आपण जे काम करतो ते आपण प्रामाणिकपणे करत असतो. तान्हाजी हा ऐतिहासिक सिनेमा होता. या सिनेमासाठी खूप अभ्यास करावा लागला. मेहनत घ्यावी लागली होती. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे शाबासकी मिळण्यासारखं आहे".
नचिकेत पुढे म्हणाला,"राष्ट्रीय पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. 'तान्हाजी' हा माझा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. 'कट्यार काळजात घुसली' हा माझा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमालादेखील अनेक पुरस्कार मिळाले. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' हा माझा दुसरा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
'तान्हाजी' सिनेमासाठी घेतली विशेष मेहनत
'तान्हाजी' सिनेमासाठी नचिकेतने विशेष मेहनत घेतली होती. त्यासंदर्भात नचिकेत म्हणाला,'तान्हाजी' सिनेमासाठी ओम राऊतने मला स्वातंत्र्य दिलं होतं. दोन वर्ष या सिनेमाचा अभ्यास सुरू होता. सिनेमात जास्तीत जास्त खरं दाखण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील दागिणे, साड्या शोधल्या. मराठ्यांसाठी इरकल साड्यांचा वापर केला गेला. मुघलांसाठी सिल्क, बनारसी साड्यांचा वापर केला. प्रत्येक गोष्टीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. 400 वर्षे जुन्या दागिन्यांचे साचे बनवले आणि त्यांचा सिनेमात वापर केला.
नचिकेतचे आगामी सिनेमे
नचिकेतचा 'आदिपुरुष' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या विशभूषेचं काम नचिकेतने केलं आहे. दिवाळीत अभिजीत देशपांडेचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बाजीप्रभू देशपांडेंवर आधारित आहे. पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तसेच एक हिंदी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या