एक्स्प्लोर
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, 'नाळ' चित्रपटाचा टीझर लाँच
सिनेमामध्ये नागराजसोबत कोणते कलाकार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 16 नोव्हेंबरला नाळ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई : झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांच्या 'आटपाट' निर्मिती संस्थेच्या 'नाळ' चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात नागराज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर छायाचित्रकार सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. टीझरच्या सुरुवातीलाच एक शेवरी हवेत उडताना दिसते. अखेरीस ही शेवरी नदीत आंघोळ करणाऱ्या एका चिमुरड्याजवळ येते, मात्र ती पकडण्याच्या नादात त्याच्या हातून निसटते, असं 'नाळ' सिनेमाच्या टीझरमध्ये दिसतं. नागराजचं दर्शन मात्र या टीझरमध्ये घडत नाही. सिनेमामध्ये नागराजसोबत कोणते कलाकार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 16 नोव्हेंबरला नाळ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी छायाचित्रण-दिग्दर्शनासोबत कथा-पटकथेची जबाबदारी उचलली आहे. तर संवाद नागराज मंजुळेंच्या लेखणीतून उतरले आहेत. त्यामुळे पिस्तुल्या, फँड्री, सैराटनंतर नागराज काय कमाल करणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिकेत घेऊन 'झुंड' चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. यापूर्वी त्यांच्या सर्वच चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पाहा टीझर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















