Munjya Box Office Collection Day 2 : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चा जलवा; दोन दिवसांत केली 11.61 कोटींची कमाई
Munjya Box Office Collection : अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंह यांचा 'मुंज्या' हा हॉरर-विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धमाकेदार कमाई करत आहे.
Munjya Box Office Collection Day 2 : 'मुंज्या' (Munjya) हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट रिलीजआधीपासून चांगलाच चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'मुंज्या' रिलीज होऊन आता दोन दिवस झाले आहेत. 'मुंज्या'ने रिलीजच्या दोन दिवसांत किती कोटींची कमाई केली जाणून घ्या...
'मुंज्या'ची दोन दिवसांची कमाई किती? (Munjya Box Office Collection Day 2)
'मुंज्या' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता निर्मात्यांनी हा चित्रपट 1600 स्क्रीन्सवर रिलीज केला आहे. 'मुंज्या'चं जास्त प्रमोशन करण्यात आलेलं नाही. पण माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. ओपिनिंगपासून हा चित्रपट शानदार कमाई करत आहे. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
View this post on Instagram
मैडॉक फिल्म्सने शेअर केलेल्या पोस्टनुसार, मुंज्याने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4.21 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 7.40 कोटींचं कलेक्शन जमवलं आहे. त्यामुळे एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत 'मुंज्या'ने 11.61 कोटींचा गल्ला जमवला आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये 'मुंज्या'ची निर्मिती करण्यात आली आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल. 'मुंज्या' हा भारतातला पहिला सीजीआई चित्रपट आहे.
'मुंज्या' हा 2 तास 3 मिनिटांचा चित्रपट आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं यूए सर्टिफिकेट मिळालं आहे. या चित्रपटाचं कास्टिंग दमदार नसलं तरी कथानकात दम आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहावे लागेल.
'मुंज्या'चं कथानक काय? (Munjya Story)
1952 मध्ये एका मुलाला आपल्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार मिळतो. त्यानंतर पुढे काय होतं हे याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. एक वेगळा चित्रपट असल्याने या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या