Mumbai : 200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणी सौरभ चंद्रकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी
Mumbai : 200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणी सौरभ चंद्रकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.
Mumbai : 'महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप'प्रकरण (Mahadev Online Gaming App) सध्या चर्चेत आहे. या कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी टाकल्यानंतर 417 रुपयांची रक्कम गोठवली. बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. आता याप्रकरणी एक नवी अपडेट समोर आली आहे. 200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणी मुख्य आरोपी सौरभ चंद्रकर (Saurabh Chandrakar) आणि त्याच्या साथीदारा विरुद्ध ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणी मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने अॅप चालवणाऱ्या दुबईस्थित सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पलल या दोघांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे दोघेही मुळचे भिलाई, छत्तीसगढचे असून महादेव बुक अॅपचे मुख्य प्रवर्तक आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सौरभ आणि रवी हे या अॅपवरुन पाच हजार कोटी रुपये कमवत असल्याचा संशय आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणात नवं वळण
200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणात आता नवं वळण आलं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंध (पीएमएलए) न्यायालयाने या दोन आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. चंद्रकर आणि उप्पल यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हे प्रकरण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे नेण्यात आले. छत्तीसगड पोलिसांनी तपास सुरू केला आणि आता ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचं तपास करत आहे.
छत्तीसगड पोलिसांनी महादेव बुक अॅपवर 2021 मध्ये कारवाई सुरू केली आणि आत्तापर्यंत छत्तीसगड पोलिसांनी 75 एफआयआर नोंदवले आहेत. भारतभरातून 429 आरोपींना अटक केली आहे. एकूण 191 लॅपटॉप, 858 स्मार्ट मोबाईल फोन, सट्टेबाजीशी संबंधित इतर साहित्य आणि सुमारे 2.50 कोटी रुपये किमतीच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. छत्तीसगड पोलिसांनी सांगितले की सुमारे 3033 हून अधिक बँक खाती वापरली गेली आहेत. ज्यात आतापर्यंत सुमारे 1035 बँक खाती तपासानंतर गोठवण्यात आली आहेत आणि या बँक खात्यांमध्ये सुमारे 15.50 कोटी जमा आहेत. आंध्र प्रदेशसारख्या इतर राज्यातही अॅप ऑपरेटर्सविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
महादेव बुक अॅप ऑनलाइन जुगार प्रकरणात 'हे' सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर
टायगर श्रॉफ, सनी लिओनी, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली अजगर, विशाल ददलानी, नेहा कक्कड,एली एवराम, भारती सिंह, भाग्यश्री, पुलकित, किर्ती खबंदा, नुसरत भरुचा, कृष्णाभिषेक
संबंधित बातम्या