एक्स्प्लोर

Mumbai : 'महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप'वर ईडीचे छापे; टायगर श्रॉफ, सनी लिओनीसह 14 बॉलिवूडकर रडारवर

Mumbai : महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपच्या कंपनीवर ईडीने छापेमारी टाकली आहे.

Mumbai : 'महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप'च्या (Mahadev Online Gaming App) कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी टाकली आहे. या छापेमारीमध्ये 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आहेत. टायगर श्रॉफ (Tiger Shroff), सनी लिओनी (Sunny Leone), नेहा कक्कडसह (Neha Kakkar) अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आहेत.  

नेमकं प्रकरण काय?

महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपमध्ये मनी लाँड्रिंगसंदर्भात एका भव्य लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या (Saurabh Chandrakar) लग्नसोहळ्यातील आहे. मुख्य आरोपी हा अॅपच्या संस्थापकांपैकी एक आहे. सौरभ चंद्रकरच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे. ईडीकडून मुंबईसह राज्यात 39 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यादरम्यान त्यांनी 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. आता 14 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले आहेत. महादेव अॅप प्रकरणातील एका आरोपीचा लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लग्नाचा खर्च ईडीच्या स्कॅनरखाली असून गेमिंग अॅपवरुन बेकायदेशीर रोख रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

ईडीच्या रडारवर असलेल्या सेलिब्रिटींची नावे जाणून घ्या...

1. टायगर श्रॉफ (Tiger Shroff)
2. सनी लिओनी (Sunny Leone)
3. आतिफ अस्लम (Atif Aslam)
4. राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan)
5. अली अजगर (Ali Asgar)
6. विशाल ददलानी (Vishal Dadlani)
7. नेहा कक्कड (Neha Kakkar)
8. एली एवराम (Elli Avrram)
9. भारती सिंह (Bharti Singh)
10. भाग्यश्री (Bhagyashree)
11. पुलकित (Pulkit)
12. किर्ती खबंदा (Kriti Kharbanda)
13. नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha)
14. कृष्णाभिषेक (Krushna Abhishek)

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि गायक मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने (ED) कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कच्या विरोधात शोध घेतला असून पुरावे मिळवले आहेत. याप्रकरणी 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ईडीने काळबादेवी येथील आठ अंगडियांच्या परिसराची झडती घेतली. या अंगडियाने काही महिन्यांपूर्वी महादेव बुक अॅप ऑनलाइन गेमिंग सट्टेबाजी फर्मच्या प्रवर्तकांना सुमारे 106 कोटी रुपयांची रोख शहरातील इव्हेंट मॅनेजमेंट फर्मला वितरित करण्यात मदत केली आहे.

संबंधित बातम्या

Nusrat Jahan : टीएमसी खासदार नुसरत जहां ईडी कार्यालयात दाखल, फ्लॅट विक्री फसवणूक प्रकरणी चौकशी होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget