एक्स्प्लोर
'पाकिजा'च्या अभिनेत्रीची करुण कहाणी, हॉस्पिटलमध्ये सोडून मुलाचा पळ
मुंबई : गीता कपूर... कदाचित हे नाव तुमच्या विस्मृतीत गेलं असेल. मात्र कधीकाळी याच नावाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली होती. 'पाकिजा'सह शंभर चित्रपटात काम करणाऱ्या गीता कपूर यांच्या जीवनपटाचा सेकंड हाफ मोठा खडतर आहे. कारण गीता कपूर यांना हॉस्पिटलमध्ये एकटं सोडून त्यांच्या मुलाने पळ काढला आहे.
पाकिजा, रजिया सुलताना, प्यार करके देखो यारख्या हिंदी सिनेमांत या अभिनेत्री गीता कपूर यांनी काम केलं आहे. पण हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून गीता कपूर यांचा मुलगा राजा कपूरने त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवून पळ काढला आहे..
100 हून अधिक सिनेमांत काम केल्याचं गीत कपूर सांगतात. पण मुलाने थकवलेल्या हॉस्पिटलच्या बिलामुळे अभिनेत्री गीता कपूर चर्चेत आल्या आहेत.
तब्येत बिघडल्याने गीता कपूर यांचा मुलगा राजा कपूरने एका खासगी हॉस्टिलमधून अॅम्ब्युलन्स मागवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करुन तो पसार झाला. 21 एप्रिलाल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर राजा कपूर त्यांना भेटायला आला नाही, शिवाय फोनलाही उत्तर दिलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे ज्या घरात तो राहत होता, ते घरही राजा कपूर सोडून गेला आहे.
एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात असल्याने लाखोंच बिल झाला आहे. आता गीता कपूर यांची तब्येत सुधारली आहे. हॉस्पिटल त्यांना डिस्चार्ज द्यायलाही तयार आहे. पण मुलानेच पळ काढल्याने आता गीता यांना एखाद्या वृद्धाश्रमात दाखल करण्याचा डॉक्टरांचा विचार आहे.
खरंतर 2 मे रोजीच बिल थकवल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. मात्र त्याची पोलिसांनी फारशी दखल घेतली नाही.
दरम्यान आता गीता कपूर यांच्या मदतीला अनेकजण धावून आले आहेत. सिनेइंडस्ट्रीतल्या ज्या ज्या लोकांना माहिती मिळाली, त्यांनी आईला हॉस्पिटलमधून आणण्याचं आवाहन राजा कपूरला केलं आहे.
पण पोटच्या पोराने कठीण काळात या माऊलीला दिलेल्या एकटेपणावर, ना कोणतं औषध आहे आणि नाही कुठला इलाज!
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement