Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्रासोबत कोझी होताना दिसली मॉडेल, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तरुणीनं मागितली कियाराची माफी
Sidharth Malhotra with Model Video : सिद्धार्थ मल्होत्रा रॅम्पवर चालत असताना एक त्याच्या जवळ जाताना दिसत आहे. या दोघांमधील कोझी मुमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्रासोबत कोझी होताना दिसली मॉडेल, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तरुणीनं मागितली कियाराची माफी sidharth malhotra cozy video with model goes viral model apologises with kiara advani post says Sorry Kiara marathi news Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्रासोबत कोझी होताना दिसली मॉडेल, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तरुणीनं मागितली कियाराची माफी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/10/bc77f1f008073785b55484e3b76bb4771723314314291322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मॉडेल आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा अलिकडेच एका इवेंटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसला. या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा मुद्दा ठरताना दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा रॅम्पवर चालत असताना एक त्याच्या जवळ जाताना दिसत आहे. या दोघांमधील कोझी मुमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रासोबत कोझी होताना दिसली मॉडेल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा रॅम्पवर चालत आहे आणि एक मॉडेल त्याच्या जवळ जाताना दिसत आहे. सिद्धार्थ अस्वस्थ झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओवर युजर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करत म्हटलंय, "सिद्धार्थ कियारा चप्पल घेऊन तुझी वाट पाहत असेल". व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडेलने सिद्धार्थची पत्नी कियाराची माफीही मागितली आहे.
मॉडेलचा सिद्धार्थसोबतचा व्हिडीओ व्हायरल
sidharth malhotra in black?!?!? he looks absolutely stunning, FINE AS HECK pic.twitter.com/9W8AE19YsK
— 𝒘. 🤍 (@omgwashhh) August 9, 2024
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तरुणीनं मागितली कियाराची माफी
सिद्धार्थ मल्होत्रा इंडस्ट्रीत त्याच्या हॉटनेससाठी प्रसिद्ध आहे. त्याचे महिला फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे हॉट डुड सिद्धार्थसोबच रोमान्स करण्याची संधी कुणाला मिळाली तर अशी संधी कुणी का सोडेल? अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिल्लीत रॅम्पवर दिसला. यादरम्यान एक मॉडेल त्याची कॉलर पकडून त्याच्यासोबत कोझी होताना दिसली. सिद्धार्थ आणि मॉडेल यांच्यातील केमिस्ट्रीने रॅम्प वॉक दरम्यान सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सिद्धार्थ रॅम्पवर मॉडेलसोबत पोझ देताना दिसला.
चाहत्यांच्या कमेंटने वेधलं लक्ष
व्हिडिओमध्ये, मॉडेल सिद्धार्थला त्याच्या कोटने ओढताना दिसत आहे. ती त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करते आणि मग तिचे हात त्याच्या गळ्यात घालते आणि त्याला चिकटून राहू लागते. त्याचबरोबर यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोकांनी सिद्धार्थला कियाराची आठवण करून दिली तर काहींनी तो अस्वस्थ दिसत असल्याचे सांगितले. एका यूजरने लिहिले की कियारा भाभी, मला हे सहन झाले नसते. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, सिद्धार्थ भाई, जर तुम्हाला घरी जायचे असेल तर जरा जपून राहा.
मॉडेलने मागितली कियाराची माफी
दरम्यान, आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडेलने त्याची पत्नी कियारा अडवाणीची माफी मागितली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सिद्घार्थसोबत मॉडेल एलिसिया कौर आहे. मॉडेल एलिसिया कौरने रॅम्पवरील व्हिडीओ शेअर करत तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, "सॉरी कियारा." असं लिहिलं आहे. पुढच्या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, "हे आमचे काम आहे."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)