एक्स्प्लोर
Advertisement
रिव्ह्यू : मेरी प्यारी बिंदू
मनीष शर्मा या दिग्दर्शकाने दोन वर्षांपूर्वी 'नॉस्टॅल्जिक गेम' केला होता... दम लगा के हैशा... तो वर्क ही झाला. तोच फॉर्म्युला आता नव्याने करण्याचा प्रयत्न अक्षय रॉय या दिग्दर्शकाने केला आहे, तो म्हणजे मेरी प्यारी बिंदू. स्वार्थापलीकडचं प्रेम, त्याग अन् त्या माहौलाच्या फिल्म्स एव्हाना आपल्या आयुष्यात बनणंही बंद झालं आहे. चहात एक्स्ट्रा स्वीटनर पडल्यावर आपल्या चवीचं कसं होतं, तसं काहीसं आपल्याला या सिनेमात झालेलं आपल्याला दिसतं. राजकपूर, गुरुदत्त, गोल्डी आनंद यांच्या सिनेमाच्या काळातला माहौल इथे अॅक्शन करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न इथे आढळतो, पण त्या सगळ्या गोष्टींमधील उत्स्फूर्तता कशाप्रकारे आणता येईल, याचा प्रयत्न इथे केलेला आपल्याला आढळतो.
मेरी प्यारी बिंदू 60-70 च्या दशकातील नॉस्टॅल्जियाला उजळा देणारा सिनेमा आहे. ही गोष्ट आहे अभिमन्यू अन् बिंदूची... एव्हाना अभिमन्यू म्हणजे आयुष्यमान खुराना अन् बिंदू म्हणजे परिणिती चोप्रा हे एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. हे दोघं सख्खे शेजारी आहेत. पण तरीही बिंदूचं लक्ष्य केवळ गाणं आहे... अन् अभिमन्यू हा लेखक असला तरी तो मात्र बिंदूवर लट्टू असणं हे त्याचं प्रमुख काम आहे.
या दोघांची गोष्ट गुंफली आहे ती गाण्यांच्या भोवती महंमद रफी अन् आशा भोसलेंचं अभी ना जाओ छोडके... हम दोनो (1961), आरती मुखर्जीचं दो नैना और इक कहानी (मासूम 1983), किशोर कुमार अन् लता मंगशेकरांचं डिस्को 82.
या सिनेमातील संवादांमध्ये फ्रेशनेस आहे, हे मान्य करावं लागेल. लव्हस्टोरीज तो कोई भी लिख लेता है... बँकर्स भी लिख लेते है... वा बॅकग्राऊण्ड पे गोविंदा गोविंदा बजता रहगा और तू मेरे सामने घुटने टेक के माफी माँग रही होगी.
लव्हस्टोरीज या प्रेडिक्टेबल असतात, त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात एक कसब लागतं. या सगळया गोष्टींमध्ये मॅजिक लागतं. ती गंमत मात्र या सिनेमात येत नाही. कारण सिनेमा लांबलचक ताणल्यासारखा वाटतो.
चुडैल की चोली अन् ड्रॅक्युला लव्हरसारख्या कादंबऱ्या लिहिणारा लेखक म्हणून अभिमन्यू नावारुपाला आला. एक होपलेस लव्हर असतो ना तसा तो पक्का दिसतो. त्याच्या अंदाजात गंमत आहे. त्याच्या अन् परिणिती चोप्राची केमिस्ट्री कमाल वाटते. कोलकात्याच्या रस्त्यावरची त्यांची धमाल मस्त आहे.
परिणिती चोप्राचं गाण्याचं अन् संगीताबद्दलचं प्रेम तशा अर्थाने आपल्याला जाणवत नाही. कारण तिच्यापेक्षा जास्त ते अभिमन्यूच्या बोलण्यातून त्याच्या कृतीतून जाणवतं.
दिग्दर्शकाने ज्याप्रकारे 80 च्या दशकातील कोलकाता अन् आताची मुंबई ज्या पद्धतीने दाखवलीय त्या सगळ्यामध्ये एकप्रकारची हुशारी आहे. दुर्गापूजेत मूर्तीपूजेला असलेल्या महत्त्वापासून अगदी त्या रूपकात्मकता जपत ते अगदी मुंबईत एकट्या मुलीला घर भाड्याने देण्याऐवजी एका गृहिणीला ती जागा पटकन भाड्याने मिळण्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टींचा ऊहापोह होताना इथे दिसतो.
पण या सगळया गोष्टीला असलेलं रॅपर हे नॉस्टॅल्जियाचं असल्यामुळे त्यातल्या त्यात हे सारं सुसह्य करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. या सिनेमात असलेला हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. 500 डेज ऑफ समरचा असलेला हा अनोखा अंदाज आहे.
लेखक अन् प्रेमवीर म्हणून आपल्यासमोर येणारा आयुष्यमान खुराना त्याचा ठसा उमटवतो. त्याच्या व्यकितेरेखेला असलेला अंडरकरण्ट त्याने नेमकेपणाने जोखलेला आहे. त्यामुळे या साऱ्यामध्ये तो चमकून जातो. तुलनेने एकूण व्यक्तिरेखेची खोली न ओळखल्यासारखी काहीशी अनभिज्ञ अशी परिणिती चोप्रा राहिलेली वाटते. मात्र काही ठिकाणी ती आवडून जाते. या दोघांमधील केमिस्ट्री अन् लहानपण ते पौगंड अन् त्यानंतर तारूण्य अशा असणाऱ्या स्टेजमध्ये ती गंमत येते. खट्टीमिठी असलेली लव्हस्टोरी आहे.
तो त्याचं मत व्यक्त न करू शकणारा अन् ती सारं काही अर्ध्यावर सोडून वेगवेगळं काहीतरी करण्यात सतत इंटरेस्ट घेणारी... पण आरंभशूर असणाऱ्या बिंदूचं कायच करायचं असं होतं.
एक जिवापाड प्रेम करणारा अन् दुसरी तितकीच तुटक-तुटक वागणारी... तितकीच अर्धवट असलेली सारं काही अर्ध्यावर सोडणारी अन् थांग न लागणारी काहीशी गोंधळेली नेमकं काय हवंय, हे ठाऊक नसलेली...
रोमॅण्टिक कॉमेडीचा हा मसालेपण आहे. त्यामुळे सारं काही तुकड्या-तुकड्यांमध्ये आवडतं, पण तरीही हा सारा खेळ फसल्यासारखा वाटतो.
का पाहावा – रॉमकॉम आवडत असेल तर, नॉस्टॅल्जिक फीवर देणारा
का टाळावा – लांबलचक अन् काहीसा रटाळ
थोडक्यात काय – ही बिंदू फारशी प्यारी नाही.
त्यामुळे या सिनेमाला मी देतोय दोन स्टार्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement