HIT : राजकुमार रावच्या आगामी 'हिट' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज
HIT : राजकुमार रावच्या आगामी 'हिट' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.
HIT : 'बधाई दो', 'बरेली की बर्फी', 'स्त्री', 'द व्हाइट टायगर' सारख्या सिनेमामुळे राजकुमार राव (Rajkumar Rao) चर्चेत आहे. राजकुमारचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सध्या राजकुमार राव 'हिट' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. राजकुमारच्या आगामी सिनेमाचे नाव 'हिट- द फर्स्ट केस' (Hit The First Case) असे आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
'हिट' सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये राजकुमारचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या अॅक्शन थ्रिलर सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. पोस्टरमध्ये एक कार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. तसेच राजकुमारचीदेखील झलक पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. मोशन पोस्टरमध्ये राजकुमारचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
तेलुगू सिनेमाचा रिमेक
15 जुलै 2022 ला 'हिट- द फर्स्ट केस' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक होमिसाइंड इंटरवेंशनमधील एका अधिकाऱ्यावर आधारित आहे. हा सिनेमा 'हिट- द फर्स्ट केस' या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. शैलेन कोलानुने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या तेलुगू सुपरहिट सिनेमात विश्व सेन आणि अभिनेत्री रुहानी शर्मा मुख्य भूमिकेत होते.
15 जुलैला सिनेमागृहात होणार प्रदर्शित
'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सान्या मल्होत्रादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना 15 जुलैला पाहायला मिळणार आहे.
'हिट- द फर्स्ट केस' हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'हिट' या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमात एका अशा पोलिसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो एका महिलेचा शोध घेत आहे. 'हिट - द फर्स्ट केस' या चित्रपटामधून पहिल्यांदाच राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या