एक्स्प्लोर

माजी मिस इंडिया उशोशी सेनगुप्ताशी गैरवर्तन, सात तरुणांना अटक

तीन बाईक्सवर आलेल्या सहा जणांनी आम्हाला मारहाण केली. मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे त्यांनी मला बाहेर खेचलं आणि व्हिडिओ डिलीट करुन फोन तोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी मिस इंडिया युनिवर्स आणि मॉडेल-अभिनेत्री उशोशी सेनगुप्ताने केला आहे.

कोलकाता : हुल्लडबाज तरुणांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप माजी मिस इंडिया युनिवर्स आणि मॉडेल-अभिनेत्री उशोशी सेनगुप्ताने केला आहे. उशोशीने फेसबुकवरुन आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची वाच्यता केली होती. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. उशोशी सेनगुप्ताने 2010 साली मिस इंडिया युनिवर्सचा किताब पटकावला होता. उशोशी आपलं काम आटोपून कोलकात्यातील एका हॉटेलमधून घरी येण्यासाठी निघाली होती. सोमवारी रात्री 11.40 वाजता ती एका सहकाऱ्यासोबत निघाली. दोघांनी उबर बूक केली होती. अर्ध्या रस्त्यात काही तरुणांचं टोळकं आलं आणि त्यांनी उशोशीच्या कॅबला बाईकने टक्कर दिली. इतक्यावर न थांबता त्यांनी कॅब चालकाला बाहेर काढून मारहाण करायला सुरुवात केली. 'घटनास्थळी एक पोलिस अधिकारी होता. मी त्यांना तरुणांना थांबवण्यास सांगितलं. मात्र हे भवानीपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याचं सांगून त्यांनी मला टोलवलं. वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी काही जणांना अटक केली, मात्र त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन पळ काढला. तेव्हा कुठे भवानीपूर पोलिसातून दोघं पोलिस आले' असं पुढे उशोशीने फेसबुकवर लिहिलं आहे. उशोशी आणि तिच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरुन निघण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही काही जण पाठलाग करत होते. 'तीन बाईक्सवर आलेल्या सहा जणांनी आम्हाला मारहाण केली. मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे त्यांनी मला बाहेर खेचलं आणि व्हिडिओ डिलीट करुन फोन तोडण्याचा प्रयत्न केला. मी आरडाओरडा केल्यावर काही जण जमा झाले.' असा दावा उशोशीने केला आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल न केल्यामुळे कोलकाता पोलिस आयुक्तांनी तपासाचे आदेश दिले आहेत. माजी मिस इंडिया उशोशी सेनगुप्ताशी गैरवर्तन, सात तरुणांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Embed widget