एक्स्प्लोर
कपिल शर्माच्या घराबाहेर आमदार राम कदम यांचं आंदोलन
मुंबई: भाजप आमदार राम कदम यांनी कॉमेडिअन कपिल शर्माविरोधात आंदोलनास सुरुवात केली. ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कपिलकडून लाच मागितली, त्यांची नावं कपिलनं जाहीर करावीत, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडून ५ लाखांची लाच मागितल्याचा दावा कपिलनं ट्विटरवरुन केला होता.त्यानंतर या वादाला तोंड फुटलंय.
राम कदम यांनी आधी ओशिवरा पोलीस ठाण्यात कपिलविरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्याच्या घराबाहेर आंदोलन सुरु केलं आहे.
PHOTO: कपिल शर्माच्या घराबाहेर राम कदम यांचं आंदोलन
काय आहे प्रकरण ?
कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्वीट करुन महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या मंजुरीसाठी 5 लाख मागितल्याचा आरोप केला. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 15 कोटींचा टॅक्स भरल्याची आठवणही त्याने करुन दिली. शिवाय ‘हेच का अच्छे दिन?’ असा खोचक सवालही विचारला. मात्र ज्या बांधकामासाठी लाच मागितली गेली, ते वर्सोव्यातील ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे. वर्सोव्याच्या ज्या भागात हे ऑफिस थाटलं जातंय, तो भाग, रहिवाशी बांधकामासाठी राखीव आहे. पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरु असल्याचा आरोप आहे. कपिलनं वर्सोव्यात एका मजल्याऐवजी अनधिकृतपणे तीन मजले उभारले आहेत. त्यासाठी खारफुटीचं जंगलही तोडल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने तसंच मनसेनेही केला आहे. कपिलच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनंही लाचखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्मानं उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे. कपिल शर्माचं मुंबईतील शुटिंग बंद पाडू अशा इशारा मनसेनं दिल्यानंतर कपिल शर्माने सावध पवित्रा घेतला होता. आणखी एक ट्वीट करत ‘मी फक्त भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. भाजप, शिवसेना किंवा मनसेवर कुठलाही आरोप केला नाही’ असा दावा कपिल शर्माने ट्वीटद्वारे केला.संबंधित बातम्या :
ट्वीट कपिलवरच बूमरँग, पाडकामाचा खर्च पालिका वसूल करणार …अन्यथा कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन : राम कदम मनसे-सेना-भाजपवर आरोप कुठे केला? : कपिल शर्मा लाचखोरीत मध्यस्थीचा पुरावा द्या अन्यथा…, कपिलला मनसेचा इशारा कपिल शर्माचं ऑफिसच वादात, ते ट्विट कपिलवरच उलटणार? कपिल भाई, लाचखोराचं नाव सांग, त्याला सोडणार नाही : मुख्यमंत्री कपिलचा मुखवटा घालून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल बीएमसीने 5 लाखांची लाच मागितली : कपिल शर्माअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement