Kiran Mane: जब बंदूक न हुई, तब तलवार होगी, हम लड़ेंगे साथी; ठाकरेंसाठी किरण मानेंची धडाकेबाज पोस्ट
अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर एक पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
MLA Disqualification Case Kiran Mane Reaction: शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आज निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर एक पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामधील एका पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं-
कत्ल हुए जज़्बात की क़सम खाकर,
बुझी हुई नज़रों की कसम खाकर,
हम लड़ेंगे साथी... हम लड़ेंगे...
जब बंदूक़ न हुई, तब तलवार होगी...
जब तलवार न हुई,
...लड़ने की 'लगन' तो होगी !
लड़ने का ढंग न हुआ, लड़ने की 'ज़रूरत' तो होगी !!
हम लड़ेंगे साथी...
हम जीतेंगे,
ज़ाहिर है कि हम ही जीतेंगे
जो दूर बड़ी... और मुश्किल है,
उस मंज़िल तक हम पहुंचेंगे !
View this post on Instagram
फेसबुकवर शेअर केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलं, 'औरंगजेबाने या मुलूखावर 51 वर्ष राज्य केलं होतं. तरीही आज हा मुलूख छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता 'हिसकावणं' सोपं असतं... पण रयतेची मनं जिंकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून बलाढ्य शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करतो!' किरण माने यांच्या दोन्हीही पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्या किरण माने यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन त्यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यापोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "शिवबंधन आधीपासून मनाशी बांधलेलंच होतं घट्ट. आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं. ते ही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्या पिढीतल्या शिलेदारानं.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र."
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: