मिताली मयेकर आणि सुयश टिळकचा 'हॅशटॅग प्रेम' 17 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
मिताली मयेकर आणि सुयश टिळकची नवी कोरी जोडी असणारा 'हॅशटॅग प्रेम' येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Hashtag Prem : 'हॅशटॅग प्रेम' हा आगामी बहुचर्चित मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनमुळं लांबणीवर गेलेला 'हॅशटॅग प्रेम' येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर अगोदरच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षण असणार आहे.
शटॅग प्रेम'च्या ट्रेलरमध्ये मिताली-सुयश या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आता चित्रपटात ही जोडी कशा प्रकारे धमाल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीदेखील आतुर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक संदेश दिला आहे. सुमधूर गीत-संगीताचा साज लेऊन सजलेलं या चित्रपटाचं आजच्या युगातील कथानक प्रेक्षकांना नक्कीच आपलंसं वाटणार आहे.
दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि प्रभावी कथानक हे या चित्रपटाचे सर्वात मोठे प्लस पॅाइंट असून, चित्रपट पाहताना प्रेक्षकांना याचा अनुभव येईल असं निर्माते अनिल गोविंद पाटील यांचं म्हणणं आहे. या सिनेमाची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली आहे. डीओपी राजा फडतरे यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी रसिकांना भुरळ पाडणारी आहे. गीतकार संजाली रोडे आणि कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार प्रविण कुवर यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी गायक-संगीतकार रोहित राऊतनं सांभाळली आहे. कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केलं असून, महेश भारंबे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
संबंधित बातम्या
बॉन्डपट No Time to Die ची आत्तापर्यंत जगभरात 5 हजार 271 कोटींची कमाई
Vicky Kaushal - Katrina Kaif Wedding : नव्या घराच्या सजावटीत व्यस्त कतरिना आणि विकी
Bigg Boss Marathi 3 : 'डॅडीचा जावई' पुन्हा बिग बॉसमध्ये? अक्षय वाघमारेच्या इंस्टापोस्टमुळे चाहत्यांमध्ये आनंदीआनंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha