Vicky Kaushal - Katrina Kaif Wedding : नव्या घराच्या सजावटीत व्यस्त कतरिना आणि विकी
कतरिना कैफने (Katrina Kaif) लग्नाच्या कपड्यांची ट्रायल सुरू केली आहे. तसेच नव्या घराच्या सजावटीलादेखील सुरुवात झाली आहे.
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. दोघे लवकरच विवाहबंधनात अडकले जाऊ शकतात. 7 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. अद्याप दोघांनी लग्नासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण आता कतरिना आणि विकीने लग्नाची तयारी सुरू केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विकी कौशलने जुहू येथे भाड्याने घर घेतलं असून त्याचे भाडे दरमहा आठ लाख रुपये असल्याचं म्हटले जात आहे. लग्नानंतर दोघे नव्या घरी राहायला जाणार आहेत. या घराच्या सजावटीत सध्या कतरिना आणि विकी व्यस्त असल्याचे समजले जात आहे. तसेच लग्नाच्या कपड्यांची ट्रायल सुरू केली असल्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. लग्नसोहळ्यात कोणत्या दिवशी कोणते कपडे परिधान करायचे याची नोंद करायला कतरिनाने सुरूवात केली आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अडकणार विवाहबंधनात
विक्की कौशल आणि कतरिना कैफने लग्नासाठी डिसेंबरचा महिना निवडला आहे. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. हा लग्नसोहळा साधासुधा नसून अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार आहे. हा विवाह सोहळा 700 वर्ष जुन्या असलेल्या राजस्थानमधील एका किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधवपूर येथील एक रिसॉर्ट बूक करण्यात आला आहे. या लग्नात कोण उपस्थित असणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
कतरिना-विकीचे नुकतेच प्रदर्शित झालेले सिनेमे
कतरिनाचा 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. कतरिना सोबत सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंगदेखील दिसून आले आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच लोकप्रिय झाला होता. तर विकी नुकताच 'सरदार उधम' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सरदार उधम' सिनेमातील विकीच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.
संबंधित बातम्या
Katrina Kaif Ranbir Kapoor Breakup : ...म्हणून आला कतरिना आणि रणबीरच्या नात्यात दुरावा!
Govinda Song Release : 'टिप टिप पाणी बरसा' गोविंदाचे नवे गाणे प्रदर्शित, 90 च्या दशकात घेऊन जाणारं गाणं
Miss World Manushi Chhillar : लाखो रुपयांच्या गुलाबी साडीत खुललं Manushi Chhillar चं सौंदर्य; खास फोटो चर्चेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha