बॉन्डपट No Time to Die ची आत्तापर्यंत जगभरात 5 हजार 271 कोटींची कमाई
बॉन्डपट No Time to Die ची आत्तापर्यंत जगभरात 5 हजार 271 कोटींची कमाई झाली आहे. यातले 1 हजार 119 कोटी रुपये अमेरिका आणि कॅनडामधून तर उरलेले 4 हजार 151 रुपये जगभरातील 72 देशांमधून कमावले आहेत.
No Time To Die Box Office Collection : लवकरच नो टाईम टू डाय (No Time To Die) हा चित्रपट फास्ट अँड फ्युरिस - 9 या विन डिझेलच्या चित्रपटाला मागे सारत कोविड काळात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरणार आहे. गेल्या आठवड्यात 'नो टाईम टू डाय' (No Time ToDie) ने जगभरातील 74 मार्केट्समध्ये 212 कोटींची कमाई केली आहे.
नो टाईम टू डाय हा पंचविसावा बॉन्डपट आहे. तर बॉन्ड म्हणून डॅनियल क्रेगचा शेवटचा सिनेमा आहे. 2006 साली कसिनो रॉयालमधून क्रेग पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला, पसंतीस पडला. जेम्स बॉन्ड या गुप्तहेराला मानवी चेहरा देण्याचं काम डॅनियल क्रेगने केलं. त्यानंतर गेल्या 15 वर्षात त्याने क्वांटम ऑफ सोलॅस (2008), स्कायफॉल (2012), स्पेक्टर (2015) आणि आता नो टाईम टू डाय असे एकूण पाच सिनेमे दिले.
नो टाईम टू डाय हा क्रेगचा शेवटचा सिनेमा असल्याने बॉन्डचे जगभरातील चाहते यात भावनिकदृष्ट्या बरेच अडकले होते. दिग्दर्शक केरी 'जोजी' फुकुनागा याने क्रेगचा बॉन्ड आणि त्याच्या चाहत्यांमधील भावनिक बंध आणखी घट्ट करण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. प्रख्यात संगीत दिग्दर्शक हन्स झिमर यांच्या संगीत भावनिक प्रसंगाला आणखी वरच्या पातळीवर नेण्याचं काम करतं त्यामुळे क्रेगच्या बॉन्डला निरोप देताना डोळ्यात अश्रू असले तरी त्याला साजेसा निरोप दिल्याचं समाधान मिळाल्याची भावनाही प्रेक्षक व्यक्त करत आहेत. या सिनेमात क्रेगला ली सिडक्स, एना डि अर्मा, लशना लिंच, रामी मलिक, जेफ्री राईट यांची चांगली साथ लाभली.
डॅनियल क्रेगच्या पहिल्या चार बॉन्डपटांनी जगभरातून साधारण 26 हजार कोटींची कमाई केली आहे.
डॅनियल क्रेगच्या जागी नवी बॉन्ड म्हणून कोणाची निवड होणार याची चर्चा आणि उत्सुकता गेली तीन चार वर्ष जोरात आहेत. मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या :
जेम्स बॉन्डचा मराठमोळा अंदाज, बॉन्डच्या चित्रपटाचा ट्रेलर मराठीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha