एक्स्प्लोर

Hrithik Roshan Mirzapur : मिर्झापूरमध्ये दिसणार ऋतिक रोशन? पंकज त्रिपाठींच्या जागी कालीन भैयाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता

Mirzapur Movie : मीडिया रिपोर्टनुसार, मिर्झापूर या हिट वेब सीरिजचं आता चित्रपटात रुपांतर करण्यात येणार असून त्याच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे.

Mirzapur Movie Adaption : ओटीटीवरील काही वेब सीरिज दमदार कथानक आणि जबरदस्त कलाकारांच्या अभिनयामुळे चांगल्याच गाजल्या, त्यातीच एक म्हणजे मिर्झापूर वेब सीरिज. मिर्झापूर वेब सीरिज पहिल्या सीझनपासून अलिकडेच आलेल्या तिसऱ्या सीझनपर्यंत दमदार पटकथेनं प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळवली. ही सीरिज चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत.

मिर्झापूर वेब सीरिज आता नव्या रुपात?

प्रसिद्ध मिर्झापूर (Mirzapur Web Series) वेब सीरिज आता नव्या रुपात प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वेब सीरिजचे निर्माते याचं चित्रपटात रुपांतर करण्याच्या तयारीत असून त्याच्या स्क्रिप्टवर काम सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही काळापासून, या सीरीजला चित्रपट रूपांतरित केले जात असल्याची चर्चा सुरा आहे. त्यातच आता अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या जागी अभिनेता हृतिक रोशनला कालिन भैय्याची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

काय म्हणाले मिर्झापूरचे दिग्दर्शक?

दरम्यान, मिर्झापूरचे दिग्दर्शक गुरमीत सिंह यांनी याबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान, गुरमीत सिंह यांनी मिर्झापूर वेब सीरिजवर आधारित चित्रपटात हृतिक रोशन झळकणार असल्याचा दावा करणाऱ्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या निर्णयात निर्माता आणि स्टुडिओचा सहभाग असून, याबाबत अधिकृत वक्तव्य आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुन्ना भैया आणि शरद शुक्ला यांचं पुनरागमन होणार?

दिव्येंदू शर्मा म्हणजे मिर्झापूरमधील प्रेक्षकांचे लाडके मुन्ना भैया आणि शरद शुक्ला यांच्या पुनरागमनाबाबतही त्यांनी खुलासा केला आहे. गुरमीत सिंह यांनी स्पष्ट केलं आहे की, आगामी हंगामात मुन्ना भैया आणि शरद शुक्ला कोणत्याही परिस्थितीत परतणार नाहीत. या पात्रांचा मृत्यू झाला आहे आणि कोणत्याही मृत पात्राचे पुनरुज्जीवन केल्याने कथा कमकुवत होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. यानंतर प्रेक्षकांची मात्र काहीशी निराशा झाली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

मिर्झापूरच्या चौथ्या सीझनची प्रतीक्षा

मिर्झापूरच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. मिर्झापूरच्या चौथ्या सीझनमध्ये कथानकात वेगळं वळण पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. दिग्दर्शक गुरमीत सिंह यांनी सांगितलं की, चौथा सीझन अद्याप लेखनाच्या टप्प्यात आहे. लेखक आगामी सीझनध्ये प्रेक्षकांना काहीतरी खास दाखवण्याची तयारी करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Video : राजकुमार रावच्या लग्नाच्या रात्रीची सीडी चोरीला, 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; मल्लिका शेरावतची सरप्राईज एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget