![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Video : राजकुमार रावच्या लग्नाच्या रात्रीची सीडी चोरीला, 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; मल्लिका शेरावतची सरप्राईज एन्ट्री
Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer : 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला असून याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
![Video : राजकुमार रावच्या लग्नाच्या रात्रीची सीडी चोरीला, 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; मल्लिका शेरावतची सरप्राईज एन्ट्री Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer Rajkummar Rao Triptii Dimri Release date 11 oct marathi news Video : राजकुमार रावच्या लग्नाच्या रात्रीची सीडी चोरीला, 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; मल्लिका शेरावतची सरप्राईज एन्ट्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/14/82752502b1cc320217e669e2a9933fc61726295118308322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer : 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या आगामी कॉमेडी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात 90 च्या दशकातील नवविवाहित जोडप्याची रंजक गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांच्या भरभरुन कौतुक होत आहे.
'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटाचा ट्रेलर
'स्त्री 2' (Stree 2) ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर राजकुमार राव (Rajkumar Rao) आता त्याच्या आगामी कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' हा (Vicky Vidya Ka Woh Wala Video) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने लोकांची उत्कंठा वाढवली आहे. 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना रोमान्स, ड्रामा आणि कॉमेडीचा पुरेपूर डोस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
लग्नाच्या रात्रीची सीडी चोरीला
विकी विद्या का वो वाला व्हिडीओ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवविवाहित विकी आणि विद्या यांनी त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे दाखवण्यात आले होते, ज्याची सीडी कुठेतरी चोरीला गेली होती. या प्रकरणाची उकल करताना पोलिस इन्स्पेक्टर मल्लिका शेरावतच्या प्रेमात पडतात. आता या सीडीचा तपास पोलीस निरीक्षक विजय राज कसा करणार हे पाहावं लागणार आहे.
विक्की आणि विद्याचा कॉमेडी ड्रामा
'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटात राजकुमार राव विकीच्या भूमिकेत आणि तृप्ती डिमरी विद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर विक्की आणि विद्याच्या लग्नाच्या फोटोशूटने सुरू होतो. यानंतर त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा सीन दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये विकी विद्याला सांगतो की, ते हॉलिवूडच्या कपल्सप्रमाणे त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडीओ बनवतील. नंतर या व्हिडीओची सीडी चोरीला जाते आणि इथूनच पुढे कॉमेडी ड्रामाला सुरुवात होते.
पाहा चित्रपटाचा मजेदार ट्रेलर
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ruhani Sharma : अनुष्का शर्माच्या बहिणीचा इंटिमेट सीन व्हायरल, एका VIDEO मुळे रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)