एक्स्प्लोर
Advertisement
अँटी-एजिंग क्रीम जाहिरातीमुळे ट्रोल, मीरा राजपूत म्हणते...
वयाच्या 23 व्या वर्षी 'अँटी एजिंग क्रीम' कोण लावतं? असं म्हणत काही जणांनी मीरा राजपूतला सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं होतं.
मुंबई : अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत लग्नापासूनच लाईमलाईटमध्ये आहे. 23 वर्षांच्या मीराने नुकतीच एका अँटी-एजिंग क्रीमची जाहिरात केली होती, त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र मीराने या ट्रोल्सना सकारात्मक पद्धतीने उत्तर दिलं आहे.
'ओले' कंपनीच्या #रिबॉर्न या कॅम्पेनमध्ये मीरा सहभागी झाली होती. प्रेग्नन्सीच्या काळात चेहऱ्यावर तजेला कायम राखण्यासाठी हे क्रीम आवश्यक असल्याचं तिने जाहिरातीत सांगितलं होतं. मात्र वयाच्या 23 व्या वर्षी 'अँटी एजिंग क्रीम' कोण लावतं? असं म्हणत काही जणांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं होतं.
'इंटरनेट आजकाल सर्वांना सहज उपलब्ध झालं आहे. सोशल मीडिया यूझर्स त्यांना हवं ते लिहितात. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. प्रत्येकाला तुम्ही आवडाल असं नसतं. मी सुद्धा मला वाटतं तसं न लाजता बोलत आले आहे, मग लोकही आपलं मत व्यक्त करणारच ना!' असं मीरा म्हणते.
'हे माझ्यासाठी नवीन नाहीये. तुम्ही काहीही करा किंवा बोला, तुमच्यावर टीका होतेच. इंटरनेट असंच आहे. एका अर्थी हे खूप वाईट आहे' अशी खंतही मीराने व्यक्त केली.
37 वर्षांचा शाहिद आणि मीरा यांच्या वयात 14 वर्षांचं अंतर असल्यामुळे सुरुवातीपासूनच दोघांची खिल्ली उडवली जात होती. मीरा आणि शाहिद यांना 'मिशा' ही दीड वर्षांची मुलगी असून मीरा पुन्हा प्रेग्नंट आहे.
दुसरीकडे, जाहिरात विश्वात पदार्पण केल्यामुळे मीरा राजपूतवर कौतुकाचा वर्षावही होत आहे. जाहिरातीत काळ्या ड्रेसमध्ये मीरा अत्यंत ग्लॅमरस दिसत असल्याच जाणकारांनी म्हटलं आहे. कॅमेरासमोर मीराचा आत्मविश्वास झळकत असला, तरी चित्रीकरणाच्या वेळी आपण खूप नर्व्हस होतो, असं ती म्हणते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
क्राईम
Advertisement