एक्स्प्लोर

Mika Singh : महागड्या लक्झरी कार्स, खासगी जेटचा मालक; गायक मिका सिंहची संपत्ती किती?

Mika Singh Birthday : मिका सिंह हा सिनेइंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध गायक आहे. आपल्या आवाजाच्या बळावर त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. मिका सिंह हा 10 जून रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Mika Singh Birthday :  प्रत्येक गायकाची एक शैली असते. आपल्या आवाजावर गायक मिका सिंह (Mika Singh) प्रेक्षकांना थिरकरण्यास भाग पाडतो.  मिका सिंहच्या आवाजातील गाण्याशिवाय कोणतीही पार्टी, सेलिब्रेशन हे अपूर्णच असते. मिका सिंह हा भारतातील सगळ्यात श्रीमंत गायकांपैकी एक गायक आहे. मिका सिंह हा सिनेइंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध गायक आहे. आपल्या आवाजाच्या बळावर त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. मिका सिंह हा 10 जून रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

पश्चिम बंगालमध्ये जन्म, भाऊ दलेरमुळे संगीताकडे ओढा...

मिका सिंहचा 10 जून 1977 रोजी पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये जन्म झाला. मिका सिंहचे खरं नाव अमरिक सिंह आहे. मिका सिंहला 6 भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यातील एक मोठा भाऊ म्हणजे दलेर मेंहदी आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेत मिका सिंहनेदेखील संगीताच्या क्षेत्रात प्रवेश केला. मिका सिंह हा पंजाबी कुटुंबातून येतो. पाटणा साहिब गुरुद्वारामधून त्याने आपल्या गायनाचे धडे गिरवले. लहानपणापासूनच मिका सिंहचा संगीत क्षेत्राकडे ओढा होता. त्याने आपली आवड जोपासत संगीत क्षेत्रात कारकिर्द घडवली. 

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धमाल... 

मिका सिंह हा पॉप साँग गातो.  बॉलिवूड चित्रपटात त्याने गायलेली गाणीदेखील चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत. त्याशिवाय मिका सिंहचे म्युझिक अल्बमही येतात. त्याशिवाय, तो लाईव्ह कॉन्सर्टही करतो.

View this post on Instagram
 
A post shared by Mika Singh (@mikasingh)

View this post on Instagram
 
A post shared by Mika Singh (@mikasingh)

मुंबईत ड्युपलेक्स फ्लॅट, खासगी जेट

मिका सिंहने 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितले होते की तो ड्युपलेक्स फ्लॅटमध्ये राहतो. कपिल शर्मा आणि तो एकाच इमारतीत राहतात. मिका सिंहजवळ काही लक्झरी कार्स आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे त्याचे प्रायव्हेट जेट असल्याचे म्हटले जाते. 

लक्झरी कार्स, एकूण संपत्ती किती?

मिका सिंहकडे Hummer H3, Lamborghini Gallardo, Ford Mustang सारख्या लक्झरी कार्स आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मिका सिंह जवळ 6 मिलियन म्हणजे जवळपास 450 कोटी रुपयांच्या घरात संपत्ती आहे. मुंबईत शानदार घर असून त्याच्याकडे फार्म हाऊसदेखील आहे. 

मिका सिंहला पार्टीची खूपच आवड आहे. अनेकदा तो पार्टीजमध्ये दिसतो. मित्रांच्या बर्थ डे पार्टीज तो गाजवताना दिसतो. मिका सिंह  हा अद्याप अविवाहित आहे. मिका सिंहने हिंदीसह बंगाल, पंजाबी भाषेतील गाणी गायली आहेत.  मिका सिंहचे इन्स्टाग्रामवर 14.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget