Merry Christmas OTT : कतरिना कैफ अन् विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल
Merry Christmas : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Merry Christmas : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाला होता. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.
'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा सिनेमागृहात हिंदी आणि तामिळ अशा दोन भाषांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमाचं कथानक, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय अशा सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यास हा सिनेमा सज्ज आहे.
'मेरी ख्रिसमस' कुठे रिलीज होणार? (Merry Christmas Release Date)
'मेरी ख्रिसमस' या सिनेमात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 8 मार्च 2024 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा आधी 23 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
'मेरी ख्रिसमस' चित्रपटातील कलाकार
मेरी ख्रिसमस या चित्रपटामध्ये कतरिना आणि विजय यांच्यासोबतच राधिका आपटे, आदिती गावेकर, टिनू आनंद, संजय कपूर आणि विनय पाठक या कलाकारांनी देखील काम केलं आहे. या चित्रपटात राधिकाचा कॅमिओ आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. चित्रपटात दोघेही एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. चित्रपटातील कतरिना आणि विजयच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
मेरी ख्रिसमस हा चित्रपट अल्बर्ट (विजय) आणि मारिया (कतरिना कैफ) या दोन अनोळखी लोकांची कथा मांडतो, जे नकळत एकमेकांना भेटतात आणि काही घटनांच्या भोवऱ्यात अडकतात. श्रीराम राघवन यांचा हा चित्रपट असताना रोलर-कोस्टर राइडसारखा आहे. अल्बर्ट आणि मारिया यांच्या आयुष्यात काय-काय घडते? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरतो. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या