एक्स्प्लोर

Mehmood Birth Anniversary : ‘हिरो’पेक्षाही जास्त मानधन घेणारा कॉमेडियन; कधीकाळी करायचे ड्रायव्हर म्हणून काम! वाचा अभिनेते मेहमूद यांच्याबद्दल...

Mehmood Birth Anniversary : आपल्या बहारदार विनोदांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारे ‘कॉमेडी किंग’ अभिनेते मेहमूद अली (Mehmood) यांचा आज वाढदिवस आहे.

Mehmood Birth Anniversary : आपल्या बहारदार विनोदांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारे ‘कॉमेडी किंग’ अभिनेते मेहमूद अली (Mehmood) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते या जगात नसले, तरी चाहत्यांच्या मनात त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. अभिनेते मेहमूद अली यांचा जन्म 29 सप्टेंबर 1933 रोजी मुंबईत झाला होता. मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करायचे. घरच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मेहमूद मालाड ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट-गोळ्या विकायचे. लहानपणापासून मेहमूद यांचा अभिनयाकडे कल होता आणि त्यांना अभिनेता बनायचे होते.

एकदा वडिलांसोबत सेटवर गेले असता, त्यांना एका चित्रपटात अभिनेते अशोक कुमार यांच्या बालपणाची एक छोटीशी भूमिका देखील करायला मिळाली होती. अभिनेता बनण्याची इच्छा आणि स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या ध्यासाने मेहमूद यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यांनी चरितार्थासाठी अनेक कामे केली. पैसे कमवण्यासाठी त्यांनी दिग्दर्शक पीएल संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केले. या कामासाठी त्यांना 75 रुपये पगार मिळायचा. एकेकाळी ते प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला टेबल टेनिसही शिकवायचे.

‘नादान’ चित्रपटाने मिळवून दिली संधी

'नादान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलग दहा वेळा रिटेक करूनही अभिनेत्री मधुबालासमोर ज्युनिअर आर्टिस्टला त्याचे संवाद बोलता आले नाहीत, तेव्हा ही संधी मेहमूद (Mehmood) यांना मिळाली. चित्रपट दिग्दर्शक हिरा सिंह यांनी मेहमूद यांना हा डायलॉग बोलण्यास सांगितले, जो त्यांनी एकही रिटेक न करता एका दमात बोलून दाखवला. या चित्रपटासाठी मेहमूद यांना 300 रुपये मिळाले होते. अभिनय क्षेत्रात नावाजल्यानंतर त्यांना चित्रपटातील हिरोपेक्षा देखील अधिक मानधन दिले जायचे.

स्वाभिमान महत्त्वाचा!

मेहमूद जे काम हाती घेतील, ते मन लावून पूर्ण करायचे. मात्र, त्यांना कधीच कुणाची शिफारस नको होती. एकदा मीना कुमारी यांनी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक बीआर चोप्रा यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या चित्रपटात मेहमूद यांना भूमिका जरूर द्या. जेव्हा मेहमूद (Mehmood) यांना ही शिफारस कळली, तेव्हा त्यांनी चित्रपट करण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि चित्रपटातून बाहेर पडले. कोणत्याही शिफारशीमुळे नाही तर, स्व:मेहनतीवर आपल्याला काम मिळावे, अशी त्यांची इच्छा होती.

कॉमेडियन म्हणून मेहमूद यांचे ‘दिल तेरा दिवाना’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘मैं सुंदर हूं’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘नोकर’, ‘पडोसन’ हे चित्रपट लोकप्रिय ठरले. मेहमूद यांच्यावर चित्रित केलेले मोहम्मद रफी यांचे गाणे आजही लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. 1970च्या दशकात असरानी, ​​कादर खान आणि जगदीप सारख्या नवीन विनोदी कलाकारांच्या पदार्पणानंतर मेहमूद (Mehmood) यांची कारकीर्द उतरणीला लागली. अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता राजकुमार संतोषी यांचा ‘अंदाज अपना अपना’. मेहमूद यांच्या ‘कुंवरा बाप’ या चित्रपटात त्यांच्या वास्तविक जीवनाची कथा होती.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 29 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget