Telly Masala : 'ठरलं तर मग' मालिकेने मारली बाजी ते अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक; वयाच्या 68 व्या वर्षी वडिलांचे निधन
Ankita Lokhande father Shashikant Lokhande Dies : 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेवर (Ankita Lokhande) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे वडील शशिकांत लोखंडे (Shashikant Lokhande) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chinmay Mandlekar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर पाळतो 'हे' नियम; म्हणाला,"देशाचे पंतप्रधान आले तरीही..."
Chinmay Mandlekar : मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्याने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची भूमिका साकारली आहे. महाराजांची भूमिका साकारताना चिन्मय नेमकी काय तयारी करतो? कोणत्या नियमांचे पालन करतो याचा खुलासा त्याने नुकतचं एका मुलाखतीत केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serials : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'; 'या' आठवड्यात कोणत्या मालिकेने मारली बाजी?
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serials) विश्वात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन
Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 14 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती 15' सुरू होत आहे. 'कौन बनेगा करोडपती'मधील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक प्रिया पाटीलने (Priya Patil) डिझाइन केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jailer Movie Marathi Actor : रजनीकांतच्या 'जेलर'मध्ये झळकलेत दोन मराठमोळे चेहरे; एकाची तर थलायवासोबतच एन्ट्री
Jailer Movie Marathi Actor : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) हा सिनेमा सध्या देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रजनीकांतचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'जेलर' हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत. रजनीकांतच्या 'जेलर' या सिनेमात दोन मराठी कलाकारांनी काम केलं आहे.