Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक; शशिकांत लोखंडे यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन
Ankita Lokhande Father : अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन झाले आहे.
Ankita Lokhande father Shashikant Lokhande Dies : 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेवर (Ankita Lokhande) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे वडील शशिकांत लोखंडे (Shashikant Lokhande) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
अंकिताच्या वडिलांच्या मृत्यूचं कारण अद्यार समोर आलेलं नाही. अंकिताचं तिच्या वडिलांसोबत खूप घट्ट नातं होतं. आता वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवावर 13 ऑगस्टला ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
View this post on Instagram
वडिलांची लाडकी लेक अंकिता लोखंडे...
अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. अनेकदा तिने वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फादर्स डेनिमित्त तिने वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली होती. तिने लिहिलं होतं,"माझे पहिले हिरो माझे बाबा आहेत. मला तुमच्याबद्दल वाटणाऱ्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. संघर्षापासून तुम्ही तुमच्या मुलांना दूर ठेवलं आहे.
अंकिता लोखंडेचं कुटुंब हे इंदूरचं आहे. तिचे वडील म्हणजेच शशिकांत लोखंडे हे बॅंकर होते. तर आई शिक्षिका होती. काही दिवसांपासून तिच्या वडिलांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अंकिता लोखंडेबद्दल जाणून घ्या... (Who Is Ankita Lokhande)
अंकिता लोखंडे आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2009 मध्ये एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. या मालिकेत ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. 'कॉमेडी सर्कस', 'एक थी नायका' आणि 'झलक दिखला जा' अशा अनेक कार्यक्रमांत अंकिता सहभागी झाली आहे. कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी ती विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली असून अभिनयापासून दूर आहे.
संबंधित बातम्या