एक्स्प्लोर

Jailer Movie Marathi Actor : रजनीकांतच्या 'जेलर'मध्ये झळकलेत दोन मराठमोळे चेहरे; एकाची तर थलायवासोबतच एन्ट्री

Jailer : रजनीकांतच्या 'जेलर' या सिनेमात दोन मराठी कलाकारांनी काम केलं आहे.

Jailer Movie Marathi Actor : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) हा सिनेमा सध्या देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रजनीकांतचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'जेलर' हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत. रजनीकांतच्या 'जेलर' या सिनेमात दोन मराठी कलाकारांनी काम केलं आहे.

मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) आणि गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) या मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या दोन कलाकारांनी 'जेलर' या सिनेमात काम केलं आहे. गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्यात त्यांनी रजनीसोबत एन्ट्री घेतली आहे. मकरंद देशपांडे यांनी एका गुंडाची भूमिका केली असून जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते कौतूकाचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by JAILERLEO (@jailer_leo)

सॅकनिल्क एंटरनेटमेंटच्या रिपोर्टनुसार, 'जेलर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 48 कोटींची कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. दुसऱ्या दिवशी 25.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 35 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत 109.10 कोटींचा टप्पा पार करत हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

 नेल्सन दिलीपकुमारने 'जेलर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा सध्या जगभरात बोलबाला आहे. सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. जेलर हा रजनिकांत यांचा 169 वा चित्रपट आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.

'जेलर' या सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या सिनेमातील 'कावाला' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. या गाण्यामधील तमन्नाच्या डान्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली. तसेच  रथामारे,जुजुबी ही गाणी देखील या चित्रपटांमध्ये आहेत. 

संबंधित बातम्या

Jailer: रजनीकांत यांचा 'जेलर' झाला रिलीज; प्रेक्षकांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget