एक्स्प्लोर

कान्समध्ये झळकलेल्या 'पळशीची पीटी'चा ट्रेलर प्रदर्शित

'लागिर झालं जी' फेम जयडी अर्थात किरण ढाणे आणि राहुल्या म्हणजे राहुल मगदूम सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

मुंबई : धोंडिबा कारंडे दिग्दर्शित 'पळशीची पीटी...गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. या सिनेमाने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीचे नाव गौरवित केले होते तसेच राज्य सरकारच्या पुरस्कारासह अनेक चित्रपट महोत्सवामध्ये सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. येत्या 23 ऑगस्ट रोजी हो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'एबीपी माझा' या सिनेमाचा मीडिया पार्टनर आहे. 'लागिर झालं जी' फेम जयडी अर्थात किरण ढाणे आणि राहुल्या म्हणजे राहुल मगदूम सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. साताऱ्यातील पळशी गावातून जन्मलेल्या या कथेमध्ये भागी आणि विकास या दोन मुख्य पात्रांची कहाणी सांगण्यात आली आहे. भागीची तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा संघर्ष, यामध्ये तिला कोण मदत करतं किंवा कोण मागं खेचतं हे अगदी सहजपणे दाखवण्यात आलेलं आहे. तिच्या या धावत्या स्वप्नाचं काय होतं? यावर हा सिनेमा आधारलेला आहे. पळशीची पीटी या सिनेमाला महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान देऊन गौरविण्यात आले तसेच संस्कृती कलादर्पण, गोवा मराठी चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तसेच आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवातदेखील आपली चित्रपटरूपी कला सादर करण्याची संधी मिळाली. दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट 'पळशीची पीटी' मध्ये 'भागी' ची भूमिका साकारणारी किरण ढाणे, राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे (लागिर झालं जी मधील आप्पा) , विद्या सावळे (लागिर झालं जी मधील मामी) , शिवानी घाटगे , दिक्षा सोनवणे, निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे. लेखक तेजपाल वाघ यांनीदेखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून लागिर...मध्ये 'जितू काका' यांची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच संपादन केले आहे. दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांचा हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे त्यांची या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Embed widget