एक्स्प्लोर

Marathi Movie: मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी'; हृता दुर्गुळेचा चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movie: हृतानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव 'कन्नी' (Kanni) असं आहे.

Marathi Movie: मालिका, चित्रपट (Marathi Movie) आणि नाटक या माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. हृताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशताच हृतानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव 'कन्नी' (Kanni) असं आहे. या चित्रपटाचं पोस्टर हृतानं शेअर केलं आहे. तसेच तिनं या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती चाहत्यांना दिली आहे.

'कन्नी' चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष (Kanni Poster Out)

हृता दुर्गुळेनं तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये हृता ही लंडनमधील क्लॉकला मिठी मारताना दिसत आहे. तर या पोस्टमध्ये अभिनेता अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, ऋषी मनोहर, वल्लरी विराज दे देखील दिसत आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन हृता दुर्गुळेनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी'.. 8 मार्च पासून सर्व चित्रपटगृहांत!"

View this post on Instagram
 
A post shared by Hruta Durgule (@hruta12)

कन्नी कधी होणार रिलीज? (Kanni Movie Release Date)

हृता दुर्गुळेचा कन्नी हा चित्रपट 8 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कन्नी या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  हृता दुर्गुळेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या कन्नी या चित्रपटाच्या पोस्टरला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मी 8 मार्चची अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'कन्नी हे हृताच्या चित्रपटातील कॅरेक्टरचं नाव आहे का?' आता कन्नी या नावाचा अर्थ काय आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

हृताचे चित्रपट आणि मालिका 

 टाईपमपास-3, अनन्या या चित्रपटांमधील हृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हृतानं मन उडू उडू झालं, फुलपाखरु आणि दुर्वा या मालिकांमध्ये काम केलं आहे. आता हृताच्या कन्नी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Hruta Durgule: हृता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांची अशी आहे लव्ह स्टोरी; अभिनेत्रीच्या सासूनं देखील केलंय हिट मालिकांमध्ये काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget