Manoj Bajpayee: भिकू म्हात्रे ते सरदार खान, मनोज वाजपेयींच्या 'या' भूमिकांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Manoj Bajpayee Birthday : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा 23 एप्रिल रोजी 54 वा वाढदिवस आहे. मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मनोज यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच पद्मश्री पुरस्कारानं देखील त्यांचा गौरव करण्यात आला आहे. जाणून घेऊयात मनोज बाजपेयी यांचे IMDb वर सर्वाधिक-रेटिंग मिळालेले चित्रपट आणि वेब सीरिज.....
IMDb वर सर्वाधिक-रेटिंग मिळालेले मनोज बाजपेयी यांचे टॉप-10 चित्रपट आणि वेब सीरिज
1. द फॅमिली मॅन (The Family Man) - 8.7
2. सत्या (Satya) - 8.3
3. गँग्स ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) - 8.2
4. 1971 - 8.2
5. वेदम (Vedam )- 8.1
6. स्पेशल 26 (Special 26 )- 8
7. सोनचिडिया (Sonchiriya) - 7.9
8. पिंजर (Pinjar) - 7.9
9. अलीगढ (Aligarh)- 7.8
10. वीर जारा (Veer Zaara)- 7.8
मनोज वाजपेयी यांचे चित्रपट आणि वेब सीरिज
1995 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'स्वाभिमान' या मालिकेत काम करून मनोज वाजपेयी यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.शेखर कपूरच्या प्रसिद्ध चित्रपट 'बँडिट क्वीन'मध्ये मनोज वाजपेयी रुपेरी पडद्यावर झळकले होते. राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या' चित्रपटातील ‘भिकू म्हात्रे’च्या भूमिकेने त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात मनोज वाजपेयी यांनी साकारलेल्या सरदार खान या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
View this post on Instagram
'द फॅमिली मॅन' ला मिळाली प्रेक्षकांची पसंती
मनोज वाजपेयी यांच्या द फॅमिली मॅन या सीरिजनं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे ही वेब सीरिज त्यांच्या IMDb वर सर्वाधिक-रेटिंग मिळेलेल्या टॉप-10 चित्रपट आणि मालिकांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. या वेब सीरिजचे दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता लवकरच या सीरिजचा तिसरा सिझन रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी यांनी श्रीकांत तिवारी ही भूमिका साकारली होती.
मनोज वाजपेयी यांचा काही दिवसांपूर्वी गुलमोहर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. आता मनोज वाजपेयी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :