(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mann Ki Baat: "फिटनेस दोन मिनिटात होणारे नूडल्स किंवा इंस्टंट कॉफी नाहीये";पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मध्ये खिलाडी अक्षयच्या फिटनेस टीप्स
Mann Ki Baat: अक्षय कुमारनं (Akshay Kumar) मन की बात या कार्यक्रमामधील ऑडिओ मेसेजद्वारे देशातील लोकांना फिटनेसच्या काही टीप्स दिल्या आहेत.
Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज रविवारी (31 डिसेंबर) मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमामधून 2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी लोकांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, 108 वा भाग त्यांच्यासाठी खूप खास आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या आजच्या भागात काही सद्गुरु जग्गी वासुदेव, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचे ऑडिओ मेसेज ऐकवण्यात आले. अक्षय कुमारनं मन की बात या कार्यक्रमामधील ऑडिओ मेसेजद्वारे देशातील लोकांना फिटनेसच्या काही टीप्स दिल्या आहेत.
काय म्हणाला अक्षय?
मन की बात या कार्यक्रमामधील ऑडिओ मेसेजमध्ये अक्षय म्हणाला, "नमस्कार मी आहे अक्षय कुमार, सर्वातआधी मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो कारण त्यांनी मन की बात या कार्यक्रमात मला माझी 'मन की बात' मांडण्याची संधी दिली. तुम्हा सर्वांना माहित आहे की, मी फिटनेससाठी जेवढा पॅशनेट आहे त्याच्यापेक्षा जास्त पॅशनेट मी नॅचरल पद्धतीनं फिट राहण्यासाठी आहे. मला फॅन्सी जीमपेक्षा स्विमिंग करणे, बॅडमिंटन खेळणे, हेल्दी जेवण करणे हे जास्त आवडते."
पुढे अक्षय म्हणाला, "शुद्ध तूप जर आपण योग्य प्रमाणात खाल्ल तर त्याचा फायदा होतो. पण मी सध्या बघत आहे की, बरेच तरुण मुलं-मुली तूप खात नाहीत कारण त्यांना वाटतं ते जाड होती. आपल्या फिटनेससाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे? हे आपल्याला समजलं पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन लाईफस्टाईल बदला. कोणत्याही फिल्म स्टारची बॉडी पाहून लाईफस्टाईल बदलू नका. फिटनेस ही एक प्रकारची तपस्या आहे. हे दोन मिनिटात होणारे नुडल्स किंवा इंस्टंट कॉफी नाहीये. नव्या वर्षी स्वत:ला वचन द्या की, नो केमिकल्स, नो शॉर्ट कट, कसरत आणि योग करणे, हेल्दी खाणे, वेळेवर झोपणे. फिल्टरचं आयुष्य नाही तर फिटरचं आयुष्य जगा."
Join in for a very special episode of #MannKiBaat as we discuss Fit India, superfoods and more! https://t.co/6SCfnQgRxa
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2023
बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांनी ‘बुद्धिबळ’ या खेळासाठी मानसिक तंदुरुस्ती किती महत्त्वाची आहे, याबद्दल देखील मन की बात मध्ये आपले विचार मांडले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
भारत आत्मविश्वासाने भरलेला, 2024 मध्येही तोच उत्साह आणि वेग ठेवायचाय - मोदी