एक्स्प्लोर

Priyanka Chopra Daughter : प्रियांका चोप्राच्या लाडक्या लेकीचा आवाज चाहत्यांनी पहिल्यांदाच ऐकला; 'देसी गर्ल'ने शेअर केला व्हिडीओ

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राची लाडकी लेक मालतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra With Daughter Malti Mary : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने लाडकी लेक मालतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालतीचा आवाज ऐकू येत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांनी पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकला आहे.

प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालती पाळण्यात बसलेली दिसत आहे. तिचा चेहरा जरी दिसत नसला तरी  हसताना आणि रडतानाचा तिचा आवाज येत आहे. प्रियांकाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,"आम्हाला सेंट्रल पार्कमध्ये जायला आवडतं". मालतीच्या या व्हिडीओमध्ये प्रियांकाचादेखील हसतानाचा आवाज येत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडीओ (Priyanka Chopra Shared Malti Mary Video)

प्रियांकाने चाहत्यांना पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकवला आहे. तिने याआधी कधी मालतीच्या अशाप्रकारचा कोणता व्हिडीओ शेअर केला नव्हता. पाळण्यात झोपलेल्या मालतीने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून ती जोरजोरात पाय मारताना दिसत आहे. 

प्रियांकाच्या लेकीचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. प्रियांकाप्रमाणे तिच्या लाडक्या लेकीचादेखील मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खेळण्यांसोबत खेळतानाचे मालतीचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले होते. 

प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये आई-बाबा झाले. प्रियांकाने तिच्या लेकीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं आहे. 

प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट (Priyanka Chopra Upcoming Project)

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येदेखील स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'सिटाडेल' नंतर प्रियांका 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) स्क्रीन शेअर करताना दिसेल. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची झलकदेखील पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. फरहान अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

संबंधित बातम्या

Priyanka Chopra : बाबो... 'Met Gala 2023'मधील प्रियांकाच्या लूकची चर्चा; हिऱ्याच्या नेकलेसची किंमत 204 कोटी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजीSachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावलाABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Embed widget