एक्स्प्लोर
मल्लिकाला फ्रेंच कोर्टाचा झटका, घर सोडण्याचा आदेश
मल्लिका आणि सीरिल ऑक्सफॅन्स 1 जानेवारी 2017 पासून पॅरिसच्या सिक्स्टीन्थ अॅरॉनडिसमेंट या परिसरात राहतात. हा पॅरिसमधील व्हीआयपी आणि पॉश एरिया आहे.
पॅरिस : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला तिचा पॅरिसमधील फ्लॅट सोडावा लागणार आहे. भाडं थकवल्याने पॅरिसच्या न्यायालयाने तिला घर सोडण्याचा आदेश दिला आहे.
मल्लिका शेरावत आणि तिचा लिव्ह इन पार्टनर सीरिल ऑक्सेफॅन्स पॅरिसमध्ये एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहते. परंतु तिने घर मालकाचं 94 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 59 लाख 85 हजार रुपयांचं भाडं थकवलं आहे. त्यामुळे घरमालकाने मल्लिका आणि तिच्या बॉयफ्रेण्डला कोर्टात खेचलं आहे.
14 नोव्हेंबर 2017 च्या निकालात न्यायालयाने या दोघांना घरभाडं देण्याचा आदेश दिला होता. भाडं दिलं नाही तर घर सोडावं लागेल आणि फर्निचर जप्त केलं जाईल, असंही न्यायालयाने निकालात म्हटलं होतं.
मल्लिका आणि सीरिल ऑक्सफॅन्स 1 जानेवारी 2017 पासून पॅरिसच्या सिक्स्टीन्थ अॅरॉनडिसमेंट या परिसरात राहतात. हा पॅरिसमधील व्हीआयपी आणि पॉश एरिया आहे. जेम्स बॉण्डपासून हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण इथे झालं आहे.
मल्लिका शेरावतवर पॅरिसमध्ये हल्ला
या घराचं महिन्याचं भाडं 6,054 युरो म्हणजे सुमारे 4 लाख 60 हजार रुपये आहे. पण मल्लिकाने केवळ एकाच महिन्यात 2715 युरो दिले होते. त्यानंतर तिने कधीही पैसे दिले नाहीत, असा दावा घरमालकाने केला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतरही मल्लिकाला 31 मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. कारण फ्रान्समधील नियमानुसार, हिवाळा असल्यामुळे तिला 31 मार्चपर्यंत घराबाहेर काढता येणार नाही.
40 वर्षीय मल्लिका शेरावत बोल्ड इमेजमुळे चर्चेत असते. 'मर्डर' सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने 'प्यार के साईड फेक्ट्स', 'वेलकम' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर मल्लिकाचा करिअर ग्राफ खाली आला. 2016 मध्ये आलेला चायनीज चित्रपट ‘टाइम रियाडर्स’मध्ये ती शेवटची मोठ्या पदड्यावर दिसली होती.
संबंधित बातम्या
भाडं थकवल्याने मालकाने मल्लिकाला घराबाहेर काढलं!
अभिनेत्री मल्लिका शेरावतचं गुपचूप लग्न?
मल्लिका शेरावत प्रेमात पडली! लवकरच लग्नाच्या बेडीत?
बॉयफ्रेण्डसोबत इंडियन स्टाईल रोमान्स करायचाय : मल्लिका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement