Harish Pengan : दाक्षिणात्य अभिनेते हरीश पेंगन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन; यकृत प्रत्यारोपण करायला 30 लाख जमवता आले नाही
Harish Pengan : दाक्षिणात्य अभिनेते हरीश पेंगन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे.
Harish Pengan Death : दाक्षिणात्य अभिनेते हरीश पेंगन (Harish Pengan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गंभीर आजारामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
हरीश पेंगन गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. यकृताच्या समस्येशिवाय त्यांना आणखी काही गंभीर समस्या होत्या.
हरीश पेंगन यांना मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. प्रकृती गंभीर असल्याने यकृत ट्रान्सफर करणं गरजेचं होतं. पण यासाठी त्यांना 30 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांच्या बहिणीने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती. पण त्याची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
View this post on Instagram
हरीश पेंगन यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता टोविनो थॉमसने सोशल मीडियावर हरीश पेंगन यांचा एक फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"रेस्ट इन पीस चेट्टा". केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनीदेखील हरीश पेंगन यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे.
हरीश पेंगन यांचा सिनेप्रवास जाणून घ्या...
हरीश पेंगन हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी 'महेशिनते प्रथिकारम' (Maheshinte Prathikaaram), 'हनी बी 2.5', 'जानेमन', 'जया जया जया जया हे' (Jaya Jaya Jaya Jaya Hey) आणि मिन्नल मुरलीसारख्या (Minnal Murali) सिनेमांत काम केलं आहे. 'महेशिंते प्रथिकारम' आणि 'शेफीकिन्ते संतोषम' हे त्यांचे सिनेमे चांगलेच गाजले.
संबंधित बातम्या