एक्स्प्लोर
Advertisement
Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' च्या टीमच्या बसचा झाला अपघात; काही कलाकार जखमी
‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटाची टीम ज्या बसमधून प्रवास करत होती त्या बसचा अपघात झाला आहे.
Pushpa 2: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काही घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पवन कल्याण (Pawan Kalyan) स्टारर ‘हरी हरा वीरा मल्लू’ या चित्रपटाच्या सेटला आगी लागली होती आणि आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटाची टीम ज्या बसमधून प्रवास करत होती त्या बसचा अपघात झाला आहे.
तेलंगणाच्या (Telangana) नलगोंडा जिल्ह्यातील नरकेटपल्ली येथे हा अपघात झाला आहे. 'पुष्पा-2' चित्रपटाच्या शूटिंगनंतर आंध्र प्रदेशातून हैदराबादला परतणाऱ्या कलाकारांच्या बसचा अपघात झाला. नरकटपल्ली येथे 'पुष्पा-2'चित्रपटाच्या कलाकारांची बस एका आरटीसी बसला धडकली. या अपघातात जखमी झालेल्या कलाकारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पुष्पा द राइज या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रुल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
'पुष्पा द रुल' चित्रपटाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देताना दिसत आहे. तो म्हणतो, 'तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.' तर दुसरी न्युज अँकर म्हणते, 'पुष्पाला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या' आता तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी कळते. पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये गेला आहे.
पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनसोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 चित्रपटामधील रश्मिकाच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement