Malaika Arora: घटस्फोटानंतर लोकांनी दिला होता 'खान' आडनाव न हटवण्याचा सल्ला; मलायकानं सांगितला किस्सा
मलायका (Malaika Arora) आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मलायकानं तिच्या नावामधून 'खान' हे आडनाव हटवले.
Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायक अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाइफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मलायकानं तिच्या नावामधून 'खान' हे आडनाव हटवले. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मलायकानं तिच्या आडनावाबद्दल सांगितलं.
मलायका म्हणाली, 'खान कुटुंबाची सून झाल्यावर आणि माझ्या नावासमोर हे खान आडनाव लागल्यानंतर मला खूप काही मिळालं होतं. पण याचा अर्थ असा नाही की माझे आडनाव अरोरा आहे, जे खूप प्रसिद्ध आहे हे मी विसरले पाहिजे. मला असे वाटत नाही की हे आडनावामुळे मला आयुष्यात जे काही हवे आहे ते साध्य करता येईल. मला स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि दररोज खूप मेहनत करावी लागेल. जेव्हा मी माझ्या नावामधून खान हे आडनाव हटवले होते तेव्हा कोणत्याही अडथळ्याशिवाय मी काम करत होते.'
पुढे मलायकानं सांगितलं, 'अनेक लोक मला नावातून खान आडनाव न हटवण्याचा सल्ला देत होते. मला खान आवडनावाचं महत्व माहित आहे. आजही मला त्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, मी त्या कुटुंबाचा खूप आदर आहे. आजही मी त्या कुटुंबाशी जोडलेली आहे. पण माझ्या पायावर उभं राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मला माझ्या नावाच्या जोरावर आयुष्यात पुढे जायचे आहे.'
View this post on Instagram
1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन हे दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: