एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अभिनेत्री भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी सट्टेबाजी प्रकरणात अटकेत
अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचे पती हिमालय दासानी जुगाराचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली, मात्र जामिनावर त्यांची सुटका झाली.
![अभिनेत्री भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी सट्टेबाजी प्रकरणात अटकेत Maine pyaar kiya fame actress bhagyashree husband himalaya dassani arrested in gambling case अभिनेत्री भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी सट्टेबाजी प्रकरणात अटकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/03164959/Actress-Bhagyashree-Himalaya-Dassani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिचे पती हिमालय दासानी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुगार अड्डा चालवल्याच्या आरोपातून मुंबईतील अंबोली पोलिसांनी हिमालय यांना मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली.
गेल्या महिन्यात अंबोली पोलिसांनी छापेमारी करुन अनधिकृतपणे जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर हिमालय दासानी जुगाराचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं.
सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' चित्रपटात झळकल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन प्रसिद्ध झाली होती. 1990 मध्ये तिने हिमालय दासानी यांच्यासोबत विवाहगाठ बांधली. त्यानंतर भाग्यश्री फारशी बॉलिवूडमध्ये चमकली नाही.
मोजक्या हिंदी चित्रपटांनतर तिने तेलुगू, बंगाली, भोजपुरी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 2003 साली भाग्यश्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. मात्र अवघ्या तीन चित्रपटांनंतर तिने आपला मोर्चा टीव्हीकडे वळवला.
भाग्यश्री आणि हिमालय यांना अवंतिका आणि अभिमन्यू अशी दोन मुलं आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion