Mahesh Manjrekar Birthday : इच्छेविरोधात अभिनेता झाला, स्वत: च्या 'अस्तित्वा'ने झाला मराठी इंडस्ट्रीचा बिग बॉस! वाचा महेश मांजरेकरांचं 'वास्तव'
Happy Birthday Mahesh Manjrekar : अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची अभिनेता व्हायची इच्छा मुळीच नव्हती.
Mahesh Manjrekar Unknown Facts : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा आज 16 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. महेश मांजरेकर आज 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. महेश मांजरेकर चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेच पण एक उत्कृष्ट अभिनेता म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. महेश मांजरेकर यांना दिग्दर्शक बनून जगाला सिनेमाची नवी शैली दाखवायची होती, पण त्यांच्या अभिनयाने चाहत्यांना भूरळ पाडली. महेश मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घ्या.
मार्गातील 'काँटे' दूर करत झाला मराठी इंडस्ट्रीचा बिग बॉस!
महेश मांजरेकर हे केवळ अभिनेतेच नाहीत तर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माताही आहेत. त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली आहे आणि आपली जादू दाखवली आहे. महेश मांजरेकर यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी जीव टाकला. एक दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेले महेश मांजरेकर यांनी 'वास्तव' या चित्रपटातून संजय दत्तसोबत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 1999 साली आलेला वास्तव हा महेश मांजरेकर दिग्दर्शित पहिला चित्रपट. या चित्रपटाने त्यांनी बॉलिवूड चित्रपटांने वेगळ्या उंचीवर नेऊन बसवलं. वास्तव चित्रपटात त्यांनी दिग्दर्शनासोबतच महत्त्वाची भूमिका साकारली होती. वास्तव चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी 'अस्तित्व' आणि 'कुरुक्षेत्र' यासारखे दमदार चित्रपट बनवले.
अभिनेता होण्याची इच्छा नव्हती
महेश मांजरेकर यांना दिग्दर्शक म्हणून नाव कमवायचे होतं, त्यांनी अभिनेता होण्याची इच्छा नव्हती. पण त्यांनी स्वत:च्याच चित्रपटांमधील छोट्या भूमिका करून स्वत:ची ओळख निर्माण केली. दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये आधीच आपला ठसा उमटवला. महेश मांजरेकर यांनी एक अभिनेता म्हणून खरी ओळख 2002 मध्ये आलेल्या कांटे चित्रपटाद्वारे ओळख मिळाली.
'या' क्षेत्रात करिअर करायची होती इच्छा
महेश मांजरेकर यांचा जन्म 16 ऑगस्ट 1958 रोजी मुंबईत जन्मलेले मराठी कुटुंबात झाला. त्यांचं बालपण मुंबईत गेलं. त्यामुळे लहानपणापासूनच सिनेविश्वात काम करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांना दिग्दर्शक म्हणून करिअर करण्याची खूप इच्छा होती. पण, त्यांनी दूरदर्शनच्या मराठी नाटकातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली.
महेश मांजरेकर यांनी 1999 मध्ये वास्तव चित्रपटाद्वारे दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी अस्तित्व, कुरुक्षेत्र, जिस देश में गंगा रहता है, तेरा मेरा साथ रहे, वाशन यासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. महेश मांजरेकर यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुळशी पॅटर्न, रेगे या सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही अभिनय कौशल्य दाखवलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :