Maharashtra Shahir : जय जय महाराष्ट्र माझा... केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
![Maharashtra Shahir : जय जय महाराष्ट्र माझा... केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर Maharashtra Shahir Marathi Movie Latest Update Maharashtra Shahir World Television Premiere on 18 February 2024 Kedar Shinde Ankush Chaudhary Film Marathi News Maharashtra Shahir : जय जय महाराष्ट्र माझा... केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/17/bfb7df0d8fe427b90d8262ce6fc3b2701708193300895254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Shahir : लोककला म्हटलं की शाहीर साबळेंचं (Shahir Sable) नाव आपसुकच डोळ्यासमोर उभं रहातं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं फार मोठं योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.
'महाराष्ट्र शाहीर'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर कधी होणार? (Maharashtra Shahir World Television Premiere)
शाहीर साबळे हे गीतकार, लोकनाट्याचे लेखक, विनोदवीर, नाट्यदिग्दर्शक, उत्तम गायक, उत्तम छायाचित्रकार आणि ढोलकी वादक अशा अनेक भूमिकांमधून महाराष्ट्राला भेटत राहिले. अशा या बहुआयामी कलावंताची गोष्ट 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. रविवार 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता प्रवाह पिक्चरवर या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहता येणार आहे.
सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरीने (Ankush Choudhary) 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. यासंदर्भात बोलताना अंकुश चौधरी म्हणाला,"महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच चरित्रपटात काम केलं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये शाहीर साबळेंचा मोलाचा वाटा आहे. आपल्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिवर सिनेमा बनणं आणि त्या सिनेमात आपल्यालाच त्या व्यक्तिची भूमिका साकारायला मिळणं यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. अशा या थोर कलावंताच्या आयुष्यावर बेतलेला 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा घरबसल्या प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे याचा मनापासून आनंद आहे".
View this post on Instagram
'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाहीर साबळे यांचे नातू आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सांभाळली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने (Sana Shinde) शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. यासोबतच निर्मिती सावंत, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे आणि दुष्यंत वाघ अशी तगडी कलाकारांची फौज सिनेमात आहे.
मराठी भाषेचा स्वाभिमान आयुष्यभर जपणारे, मराठी लोकसंगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेला 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)