एक्स्प्लोर

Mahadev App : 'महादेव अ‍ॅप' प्रकरणात नवी अपडेट समोर; मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन

Mahadev App : 'महादेव अ‍ॅप' तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं असून यात सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Mahadev App : 'महादेव अॅप' (Mahadev App) प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. 'महादेव अॅप' तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

'महादेव अॅप' तपासासाठी मुंबई पोलिसांनी स्थापन केलं विशेष पथक

'महादेव अॅप' तपासासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलं आहे. महादेव बुक बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 15,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीसह याप्रकरणी मॅच फिक्सिंग, बेकायदा हवाला व कूट चलनाच्या व्हवहाराचे आरोप त्यांच्यावर आहेत. 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सायबर दहशतवादाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार सदस्यांचे एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. यात विशेष तपास पथकात सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय? 

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्यानं छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. त्यामुळे याप्रकरणात अनेक बॉलिवूडकर रडारवर आले आहेत. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.

महादेव अॅप प्रकरणातील आरोपींनी 2023 या कालावधीत एकूण 15 हजार कोटी रुपयांचा जुगार आणि सायबर फसवणूक केली आहे. आरोपींविरोधात कलम 420, 465, 467, 120 बी, 12 अ, जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (क), 66 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता महादेव अॅप' प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आल्याने लवकरच याप्रकरणातील खरी माहिती समोर येईल.

संंबंधित बातम्या

Mahadev App and Dabur : महादेव अॅप घोटाळ्याचे धागेदोरे डाबर ग्रुपपर्यंत? कंपनीने आरोप फेटाळले, 'त्या' डीलच्या टायमिंगकडे वेधले लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget