माधुरी दीक्षितच्या नव्या लूकवर चाहते फिदा
अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकताच इन्स्टाग्रामर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधील माधुरीच्या लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
Madhuri Dixit : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. माधुरीचा हा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या नव्या लूकमध्ये माधुरीचं हसू फुलपाखरासारखं फुलताना दिसत आहे. पींक कलरचा फ्लफी गाऊन परिधान केलेली माधुरी सोफ्यावर अनेक पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना माधुरी दीक्षितने कॅप्शनमध्ये लिहिले की, नवा दिवस, नवा अवतार... ग्रेसफुल असणे कायम आहे.
बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये अनेक अभिनेत्री येतात आणि जातात. परंतु माधुरी दीक्षित ही एक अशी यशस्वी अभिनेत्री आहे, जिने फिल्मी दुनियेत बॉलिवूडमध्ये पदार्पण करून यशस्वी झाली आहे. आजही आजही तिच्या सौंदर्यात थोडासाही फरक पडलेला नाही.
माधुरी दीक्षित सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. या व्हिडिओंमध्ये, ती तिच्या को-स्टारसोबत डान्स करताना दिसत आहे, तर कधी ती तिच्या मेमरी बॉक्समधून काही छान फोटो शेअर करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर तिचे तीन कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
माधुरी दीक्षितने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तेजाब, देवदास, दिल तो पागल है यांसारख्या शानदार चित्रपटांतून तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे. नुकतीच माधुरी दीक्षित द फेम गेममध्ये दिसली होती.
महत्वाच्या बातम्या