Lust Stories 2 Teaser: 'लस्ट स्टोरीज-2' चा टीझर रिलीज; तमन्ना, मृणाल आणि काजोल प्रमुख भूमिकेत
लस्ट स्टोरीज-2 (Lust Stories-2) चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Lust Stories 2 Teaser: नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज (Lust Stories) या चार गोष्टी असणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. जोया अख्तर (Zoya Akhtar), करण जोहर (Karan Johar), अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि दिबाकर बॅनर्जी (Dibakar Banerjee) या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या वेगवेगळ्या चार कथा लस्ट स्टोरीज या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या होत्या. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लस्ट स्टोरीज-2 (Lust Stories-2) चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. लस्ट स्टोरीज-2 चा टीझर नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
लस्ट स्टोरीज-2 ची स्टार कास्ट
काजोल (Kajol), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia), विजय वर्मा, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता (Neena Gupta) या कलाकारांनी लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
पाहा टीझर
View this post on Instagram
लस्ट स्टोरीज-2 चित्रपटाच्या टीझरला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन या टीझरचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'विजय वर्मा आणि तमन्ना यांच्यासाठी हा चित्रपट नक्की बघणार' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'नीना मॅम इज किलिंग इट'. लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटाची अजून रिलीज डेट घोषित करण्यात आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि विजय यांच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पोट देखील करण्यात आलं होतं. अशातच आता हे दोघे लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे या चित्रपटात तमन्ना आणि विजय यांची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: