Lata Mangeshkar Passes Away : लता मंगेशकर फक्त एकच दिवस शाळेत गेल्या, सहा विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन केला सन्मान
Lata Mangeshkar : स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या.
Lata Mangeshkar Life Story : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लता दीदी वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत जायला लागल्या असून त्या एकच दिवस शाळेत गेल्या.
एकच दिवस गेल्या होत्या शाळेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लता दीदी वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत जायला लागल्या होत्या. पण त्या फक्त एकच दिवस शाळेत गेल्या. लता दीदी शाळेत न जाण्यामागचं कारण आशा भोसले होत्या. त्यादरम्यान लता दीदींच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. पण आशा भोसलेंना मात्र त्यांनी शिकवले.
लता दीदी शाळेत गेलेल्या नसल्या तरीही त्यांच्याकडे सहा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदव्या आहेत. लता दीदींचा सहा विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केला आहे. म्हणजेच त्या केवळ लता मंगेशकर नसून डॉ.लता मंगेशकर आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत यासंदर्बात माहिती दिली आहे.
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दीदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. 1942 मध्ये लता दिदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांचे वडील हृदयविकाराच्या झटक्याने वारले होते. त्यानंतर लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने राजकीय क्षेत्रातही शोककळा, नेत्यांकडून दीदींना आदरांजली
Lata Mangeshkar death : 'ऐ मेरे वतन के लोगो'... ज्या दिवशी कवी प्रदीप यांचा जन्म झाला त्याच दिवशी लतादीदींनी घेतला अखेरचा श्वास
Lata Mangeshkar: लतादीदींच्या आवाजानं जंगलात गुरे देखील शांततेत चारा खात होती...!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha