Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहणार
Lata Mangeshkar : डॉ. प्रतीत समदानी यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 8-9 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
![Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहणार Lata Mangeshkar Health Update Lata Mangeshkar's condition improves she will remain in hospital for another week Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/11/82491352ef2b814304b4cf319d3f2abf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lata Mangeshkar Health Update : कोरोनाची (Corona) लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहावे लागणार आहे. एबीपी न्यूजला माहिती देताना रुग्णालयाशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आधीच सुधारणा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र, डॉक्टरांनी आणखी किमान एक आठवडा खबरदारी घेत देखरेखीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लता मंगेशकर यांना आणखी एक आठवडा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
रुग्णालयातील एका सूत्राने एबीपीशी बोलताना सांगितले की, पुढील एक आठवड्यासाठी लता मंगेशकर यांना आयसीयूमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत डॉक्टरांना कोणतीही घाई करायची नाही आणि यावेळी त्यांना बाहेरील वातावरणात देखील ठेवायचे नाही, असे सूत्राने सांगितले. असे केल्याने त्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे देखील सूत्राने सांगितले.
डॉ. प्रतीत समदानी यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 8-9 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपी न्यूजला सांगितले होते की, लता दीदींना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला 'कोविड न्यूमोनिया' असेही म्हणतात.
इतर बातम्या :
- Priyanka Chopra : गूड न्यूज! अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बनली आई, सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म
-
Lata Mangeshkar : लता दीदींच्या प्रकृतीसाठी रिक्षावाल्याचा देवाकडे धावा
- Pawankhind : इतिहासाच्या पानांमध्ये दडलेलं वैभव, मृत्यूलाही प्रतीक्षा करायला लावणाऱ्या बाजीप्रभूंची झुंज 'पावनखिंड'मध्ये!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)