Laal Singh Chaddha box office collection Day 5 : पाच दिवस लोटले, पण अद्याप पन्नास कोटींच्या क्लबपासून 'लाल सिंह चड्ढा' दूरच; एकूण कलेक्शन किती?
चित्रपटानं ओपनिंग-डेला 11.50 कोटींची कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Laal Singh Chaddha box office collection Day 5 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हे सध्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी असा अंदाज लावला जात होता की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेन. पण हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकू शकला नाही. चित्रपटानं ओपनिंग-डेला 11.50 कोटींची कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं गेल्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
लाल सिंह चड्ढा या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 11.50 कोटींची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी कमवले. तिसऱ्या दिवशी नऊ आणि चौथ्या दिवशी दहा कोटींची कमाई या चित्रपटानं केली. स्वातंत्र्यदिनाला या म्हणजेच काल (सोमवार) या चित्रपटानं 8.50 कोटींची कमाई केली. चित्रपट रिलीज होऊ पाच दिवस झाले तरी देखील हा चित्रपट पन्नास कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकला नाही. या चित्रपटानं आतापर्यंत 46.25 कोटींची एकूण कमाई केली आहे.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत तर काही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. आमिरसोबतच या चित्रपटात करिना कपूर, मनो सिंह, नागा चैतन्य या कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
सोशल मीडियावर बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंड
लाल सिंह चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी गेले काही दिवस नेटकरी सोशल मीडियावर करत आहेत. करीना आणि आमिरच्या काही जुन्या वक्तव्यांमुळे ही मागणी केली जात आहे,असं म्हटलं जात आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: