![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कुणाल कामरा आणि अनुराग कश्यप अर्णब गोस्वामीच्या भेटीला, पण...
अनुराग सातत्याने काहीतरी नवं धाडस करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून अनुराग आणि त्याचा मित्र कुणाल कामरा गेले होते अर्णब गोस्वामीला भेटायला गेले होते.
![कुणाल कामरा आणि अनुराग कश्यप अर्णब गोस्वामीच्या भेटीला, पण... kunal kamra shares photo with anurag kashyap excellence award of journalism arnab goswami कुणाल कामरा आणि अनुराग कश्यप अर्णब गोस्वामीच्या भेटीला, पण...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/10231754/WhatsApp-Image-2020-09-10-at-5.38.13-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अनुराग कश्यप आपल्या सिनेमांमुळे खूपच प्रसिद्ध झाला. असं असलं तरी त्याचा स्ट्रगल मोठा होता. त्याने मुंबईत येऊन खूपच कष्ट घेतले. तो पृथ्वी थिएटरच्या कॅंटीनमध्ये राहीला. मिळेल ते खाणं आणि पडेल ते काम करून तो मोठा झाला. टक्केटोणपे खाऊन इंडस्ट्रीने पुरता उलटा सुलटा घेतल्यानंतर अनुराग मोठा झाला. अनुरागची मतं.. त्याचं बोलणं निर्भिड असतं कारण ते अनुभवातून आलं असतं.
अनुराग सातत्याने काहीतरी नवं धाडस करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून अनुराग आणि त्याचा मित्र कुणाल कामरा गेले होते अर्णब गोस्वामीला भेटायला गेले होते. अनेकांना खोटं वाटेल पण असं खरंच झालं होतं. आणि याचा पुरावाही आहे म्हणूनच लोकांना त्याची खात्री पटेल. अनुराग कश्यप, कुणाल कामरासारखे काही जण त्यापलिकडे जाऊन आपला पवित्रा घेतात. कुणालने भर विमानात अर्णब गोस्वामींवर टीका टिप्पणी केली होती. त्यात अनुरागचीही भर पडली. अनुराग नेहमीच ट्विटरवरून आपली भूमिका घेत असतो. आता अशी दोन मंडळी एकत्र आली होती.
गुरूवारी अनुरागचा वाढदिवस. त्याला शुभेच्छा देताना कुणाल कामराने अनुराग कश्यपसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत अनुराग तर आहेच. पण दोघांच्याही हातात फोटो फ्रेम आहेत. आणि या फ्रेममध्ये आहे चक्क चप्पल. थेट चप्पल फ्रेम करून देण्याची तयारी या दोघांनी चालवली. पण त्या दोघांना गेटवर थांबवण्यात आलं. आणि अपॉइंटमेंट शिवाय आत सोडलं जात नसल्याचं सांगितलं गेलं. वारंवार सांगूनही सुरक्षा रक्षकाने काही त्यांना चॅनलच्या कार्यालयात जाऊ दिलं नाही. मग दोघांनीही खालच्या खालीच एक फोटो काढला होता. तोच फोटो कुणालने इन्स्टावर टाकला.
रिपब्लिकच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्वोत्कृष्ट पत्रकारितेचं पारितोषिक आम्हाला अर्णबला द्यायचं होतं. पण आम्हाला वर सोडलं नाही. म्हणून आम्ही खालच्याखालीच निघालो. असं इन्स्टावर टाकून कुणालने सांगितलंय. अनुरागच्या वाढदिवसानिमित्त त्याने ही पोस्ट टाकली होती. हा फोटो पाहता अनुराग आणि कुणालच्या चेहऱ्यावर मास्क आहेत. म्हणजे ही घटना अलिकडचीच आहे हे ओघानं आलंच.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)