Arjun Kapoor: 'अर्जुन घरात बसून मलायकाची सेवा करतोय'; केआरकेच्या ट्वीटनं वेधलं लक्ष
केआरकेनं एक ट्वीट शेअर करुन अर्जुनवर (Arjun Kapoor) निशाणा साधला आहे.
Arjun Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर सुरु असते. अनेक जण अर्जुन आणि मलायका यांना त्यांच्या वयातील असलेल्या अंतरामुळे ट्रोल करतात. कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ केआरकेनं हा अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुनवर निशाणा साधत असतो. नुकतचं केआरकेनं एक ट्वीट शेअर करुन अर्जुनच्या करिअरबाबात भाष्य केलं आहे
केआरकेचं ट्वीट
केआरकेनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी अर्जुन कपूरला सांगितले की, जर तू अभिनेता बनू शकतो तर प्रत्येक भारतीय सुपरस्टार होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात तुझं करिअर संपेल असा मला विश्वास आहे. आज अर्जुन कपूर त्याच्या घरी बसून मलायकाची सेवा करत आहे.'
I told to Arjun Kapoor @arjunk26 that if you can become actor then every Indian can become superstar. So I believe that your career will be finished within next 5years. Today Arjun Kapoor is sitting at his home and doing Sewa of Malaika Arora.
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2023
केआरकेनं गेल्या वर्षी देखील अर्जुनबाबत एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'अरे अर्जुन कपूर भाई, तुमच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणाऱ्यांना तुम्ही कधी धडा शिकवणार? अरेरे! पुढच्या आयुष्यात तुम्ही त्यांना धडा शिकवाल का?'
Arey Arjun Kapoor Bhai, when will you teach a lesson to those people, who do boycott your films? Aapne Inn Logon Ko Thodi Choot Dedi Thi.
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2023
Oh! you will teach them a lesson in next life? Aukaat Pata Chal Gayee Na. Tum Logon Ki Aukaat Nahi Hai public Ke Saamne. Yaad Rakkho Bollywood…
अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. अर्जुन हा मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: