Shehzada : कृती सेनन आणि कार्तिक आर्यनने 'शहजादा' सिनेमाचं शूटिंग केलं पूर्ण
Shehzada : कृती सेनन आणि कार्तिक आर्यनचा 'शहजादा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Shehzada : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कृती सेनन (Kriti Sanon) लवकरच 'शहजादा' (Shehzada) सिनेमात दिसणार आहेत. नुकतेच मॉरिशसमध्ये या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. कृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी त्यांच्या आगामी 'शहजादा' सिनेमाचे शूटिंग मॉरिशसमध्ये पूर्ण केले आहे. 'शहजादा' सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
'या' दिवशी 'शहजादा' होणार रिलीज
'शहजादा' सिनेमा हा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्या वैकुंठापुरमुलू या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. कार्तिक आर्यनचा हा सिनेमा 4 नोव्हेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. येत्या वर्षांत कार्तिकचे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. कार्तिकचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'भूल भुलैया 2' सिनेमात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणीचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या सिनेमात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे लेखन फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी केले आहे.
संबंधित बातम्या