एक्स्प्लोर

मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव

Aryan Khan Drugs Case : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग केसमुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Sameer Wankhede Will Join Shiv Sena Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता हायप्रोफाईल अधिकाऱ्याची एन्ट्री होणार आहे. हायप्रोफाईल आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील चर्चित माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आता महायुतीकडून निवडणूक लढवणार आहेत. पुढच्या दोन दिवसात समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार आहे. 

हायप्रोफाईल अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे. क्रांती रेडकर यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता त्यांनी ही बातमी खरी असल्याचं सांगत लवकरच पक्षप्रवेशाबाबत निर्णय होईल असं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांचा शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हायप्रोफाईल अधिकारी समीर वानखेडे निवडणूक लढवणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी तयारीदेखील सुरु झाली आहे. यामध्ये चर्चित समीर वानखेडे यांचंही नाव समोर येत आहे. समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात यासंदर्भात मोठी निर्णय होईल आणि लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, असं क्रांती रेडकर हिने सांगितलं आहे. 

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत

समीर वानखेडे मुंबईतून महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. समीर वानखेडे सध्या चेन्नईमध्ये एनसीबी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक होते, त्यानंतर त्यांचं चेन्नईमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. 

'या' कारणामुळे राजकारणात एन्ट्री

समीर वानखेडे (Sameer Wankhede Entry in Politics) यांना समाजकारणात रस आहे. गेल्या काही वर्षांपासून ते समाजकारणात कार्यरत आहेत. त्यांनी अंमली पदार्थविरोधी मोहिम राबवली आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ड्रग्सविरोधी मोहिम राबवत ते अंमली पदार्थांविरोधात समाजावला जागृत करण्याचं काम करत आहेत. मुंबईती तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणात येऊन हे काम आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा त्यांचा उद्देश असल्याने ते आता राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : सिकंदर चित्रपटाच्या शुटींगला लवकरच सुरुवात, बिश्नोई गँगच्या धमकीमुळे सेटवर सलमानच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारतRajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget