Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणार पाच नव्या जोड्या; रणबीर-आलियापासून अजय, शाहरुख ते रोहित शेट्टीचा सहभाग
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम 26 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 26 ऑक्टोबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्याने या पर्वात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
'कॉफी विथ करण 8'मध्ये नक्की कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याबाबत करण जोहरने भाष्य केलेलं नाही. पण काही जोड्यांच्या नावाची मात्र चर्चा आहे. यात आलिया भट्ट-करीना कपूर खान, रणवीर सिंह-दीपिका पादुकोण, रोहित शेट्टी-अजय देवगन, शाहरुख खान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा समावेश आहे.
View this post on Instagram
1. आलिया भट्ट-करीना कपूर खान ( Alia Bhatt Karina Kapoor Khan)
इंडियाटुडेच्या रिपोर्टनुसार, 'कॉफी विथ करण 8'मध्ये ननंद आणि भावजय अर्थात करीना कपूर खान आणि आलिया भट्ट हजेरी लावणार आहेत. करीना आणि आलिया यांनी नुकतीच एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीला चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
2. रणवीर सिंह - दीपिका पादुकोण (Ranveer Singh Deepika Padukone)
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने 'कॉफी विथ करण 8'साठी शूटिंग केलं आहे. अद्याप करणच्या या
2. रोहित शेट्टी-अजय देवगन (Rohit Shetty Ajay Devgn)
अजय देवगन आणि रोहित शेट्टीची जोडी 'कॉफी विथ करण 8'मध्ये झळकणार आहे. आजवर दोघांनीही बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. अजय आणि रोहित सध्या 'सिंघम अगेन' या सिनेमाचं शूटिंग करत आहेत.
3. शाहरुख खान (Shah Rukh Khan)
'कॉफी विथ करण 8'च्या एका भागात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानदेखील सहभागी होणार आहे. शाहरुख आणि करण एकमेकांचे चांगले मित्र असून दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
4. आलिया भट्ट - रणबीर कपूर (Alia Bhatt - Ranbir Kappor)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे जोडपं 'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणार आहे. नुकत्याच लग्नबंधनात अडकलेल्या एका जोडप्याला 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर बोलवणार असल्याचा खुलासा करण जोहरने केला आहे.
संबंधित बातम्या